कजर्माफीसाठी आंदोलन सुरू असतानाच कजर्बाजारी शेतक:याची आत्महत्या

By Admin | Published: June 3, 2017 05:54 PM2017-06-03T17:54:19+5:302017-06-03T17:54:19+5:30

भरत भाईदास पाटील (वय 40, रा.सातरणे, ता.धुळे) या शेतक:याने शनिवारी मध्यरात्री

Lashing farmer: Suicide | कजर्माफीसाठी आंदोलन सुरू असतानाच कजर्बाजारी शेतक:याची आत्महत्या

कजर्माफीसाठी आंदोलन सुरू असतानाच कजर्बाजारी शेतक:याची आत्महत्या

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 3 - कर्जमाफीसाठी एकीकडे  राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून हक्काची लढाई लढत असतानाच  तालुक्यातील सातरणे येथे भरत भाईदास पाटील (वय 40, रा.सातरणे, ता.धुळे) या शेतक:याने शनिवारी मध्यरात्री कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. 
 पाटील यांनी बुधवारी रात्री 12़40 वाजेच्या सुमारास राहत्या घरात  पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला़ त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी  मृत घोषित केल़े
भरत पाटील यांच्यावर विकास सोसायटी, जिल्हा बॅँकेचे लाखो रूपयांचे कर्ज थकले होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली़ एकीकडे कर्ज फेडण्याची विवंचना व दुसरीकडे हंगाम तोंडाशी आला तरी पेरणीला पैसाच नसल्याने बियाणे, खते कसे आणावे आणि शेतात पेरणी कशी करावी? संसाराचा गाडा कसा चालवायचा, या चिंतेने गेल्या काही दिवसांपासून ते त्रस्त झाले होते. त्यातूनच भरत पाटील यांनी कुटूंबिय घराबाहेर झोपलेले असतांना घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्राच संपविली़ याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद  करण्यात आली आहे. 

Web Title: Lashing farmer: Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.