अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:48 PM2019-12-22T22:48:48+5:302019-12-22T22:49:30+5:30
उमेदवारीच्या घोषणेकडे लक्ष : ७४ अर्ज दाखल
धुळे :जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची सोमवारी शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत चारही तालुक्यातून गटासाठी ३९ तर गणांसाठी ३५ असे एकूण ७४ अर्ज दाखल झालेले आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या ५६ गट व त्याअंतर्गत येणाºया चारही तालुक्यातील ११२ गणांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.. १८डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झालेली आहे. पहिले दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दरम्यान आतापर्यंत गटातून ३९ व गणांमधून ३५ अर्ज दाखल झालेले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे.आज अर्जांचा पाऊस पडू शकतो. उमेदवार निश्चितीसाठी महाविकास आघाडीतर्फे तसेच भाजपतर्फे रविवारी बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्याप एकाही पक्षाने उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही .
त्यामुळे गट व गणांमधून कोणाकोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागून आहे.