अवकाळी पावसाचा पशुधनालाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:20 PM2019-04-18T12:20:20+5:302019-04-18T12:21:27+5:30
कृषी विभाग : गेल्या तीन दिवसात गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु
धुळे : गेल्या तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचे कृषी विभागातर्फे पंचनामे सुरू झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
जिल्ह्यात रविवारपासून सलग तीन दिवस जिल्ह्यातील काही भागात वादळी वाºयासह पाऊस, गारपीट झालेली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका केळीला बसलेला आहे. साधारणपणे शिरपूर तालुक्यात ८० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान कृषी विभागातर्फे पंचनाम्याचे काम सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. अवकाळी पावसाचा जिल्ह्याला किती फटका बसला याची प्राथमिक माहिती गुरूवारपर्यंत समजू शकेल. त्याचबरोबर पंचमाने करण्यासाठी निवडणुकीच्या कामाचा कुठलाही अडसर नसल्याने कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
शिरपूर तालुका
शिरपूर- शहरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास बेमोसमी पावसाने विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली़ सांगवी मंडळात वीज पडून २ बैल ठार झाल्याची घटना घडली़
दरम्यान, शिरपूर तालुक्यात २ दिवसांपासून बेमोसमी पावसाने वादळी वाºयासह हजेरी लावल्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे़
१६ रोजी दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास शहरात वादळ व विजांचा कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली़ तसेच तालुक्यात देखील वादळ वाºयासह पाऊस झाला़ सांगवी मंडळात वीज पडून २ बैल ठार झाल्याची घटना घडली़
१४ रोजी झालेल्या वादळ वायासह बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा पंचनामा कृषी विभागाने केला आहे़ सांगवी मंडळात ८ घरांची पडझड होवून मोठे नुकसान झाले़ अजनाड शिवारात २० शेतकºयांचे ८ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले़
तरडी येथे देखील ६० शेतकºयांचे २० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले़ बभळाज येथे २० शेतकयांचे १० हेक्टर, हिसाळे येथे २५ शेतकºयांचे १० हेक्टर, तोंदे येथे ३५ शेतकºयांचे १८ हेक्टर, भोरखेडा येथे ४ शेतकयांचे ३ हेक्टर, वाघाडी येथे ३ शेतकºयांचे २ हेक्टर, नटवाडे येथे १ शेतकºयाचे १ हेक्टर, विखरण बु़ येथे १ शेतकºयाचे ३ हेक्टर तर शिरपूर शिवारात ६ शेतकºयांचे २ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले़
हिसाळे येथे ८ शेतकºयांचे ८ हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले़ एकूण १८३ शेतकºयांचे ८१़६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे वादळामुळे नुकसान झाल्याचा पंचनामा कृषी विभागाने केला आहे़
१५ रोजी झालेल्या वादळामुळे थाळनेर येथील एका शेतकयाचे १ हेक्टर क्षेत्रावरील टरबुज, बोराडी येथे ३ शेतकºयांचे २ हेक्टर क्षेत्रातील बाजरी, बलकुवा येथे २ शेतकºयांचे ०़१६ हेक्टर क्षेत्रावरील केळी तर मुखेड, तºहाडकसबे व शिरपूर शिवारातील ४ शेतकयांचे ४ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाचे नुकसान झाले़ वादळी पावसामुळे शेतकयांना दुष्काळी परिस्थितीत मोठा फटका बसला आहे.