अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार शेतीच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:44 PM2020-07-27T21:44:54+5:302020-07-27T21:45:12+5:30

कृषीदूत दाखल : अभ्यासाचा होईल शेतकऱ्यांना फायदा

The latest technology will be available on the farm | अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार शेतीच्या बांधावर

dhule

Next

धुळे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धुळे आणि दोंडाईचा येथील कृषीदूत फागणे ता़ धुळे गावात दाखल झाले असून या कृषीदूतांच्या अभ्यासाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे़ शिवाय हे विद्यार्थी शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत धुळे कृषी महाविद्यालयाचे तेजस नंदवाळकर, आशिष माळी, अश्विनी पाटील आणि दोंडाईचा येथील विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविदयालयाचे जयंत प्रमोदकुमार अहिरराव व धनंजय देवरे हे कृषिदूत फागणे ता़ धुळे गावात दाखल झाले आहेत़ हे कृषिदूत अंतिम वषार्तील विद्यार्थी असून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फागणे गावातील पीक लागवड शेती पद्धती, शेतकºयांना वित्तीय पुरवठा करणाºया सहकारी वित्त संस्थांची कार्यपद्धती, पीक प्रात्यक्षिके तसेच इतर शेतीसंबंधी माहिती गोळा करणार आहेत.
या कृषीदूतांचे गावाचे सरपंच गोकुळ सिंघवी, उपसरपंच युवराज पाटील, ग्रामसेवक एम़ एम़ मेश्राम, शाम बडगुजर तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य, तलाठी बाविस्कर व ग्रामस्थांनी स्वागत केले़
धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी़ डी़ देवकर, डॉ. ए़ बी़ गायकवाड, डॉ. संदीप पाटील, डॉ. सी व्ही़ पुजारी, डॉ. व्ही़ व्ही़ भावसार, डॉ. आऱ व्ही़ दातखिळे तसेच दोंडाईचा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, कृषी पर्यवेक्षक एम. डी. चौधरी व सर्व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे कृषिदूत ग्रामीण कृषि कायार्नुभवाचा कार्यक्रम राबवणार आहेत.

Web Title: The latest technology will be available on the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे