४१ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:27 PM2019-04-09T22:27:59+5:302019-04-09T22:28:41+5:30

आरोग्य विभाग : कुलरची केली व्यवस्था

Launch of heat-room in 41 health centers | ४१ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू

dhule

googlenewsNext

धुळे : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सीयसच्या पुढे गेलेला आहे. वाढते तापमान लक्षात घेता, आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढलेला आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अनेकांना उन्हाचा फटका बसू लागला आहे. दुपारच्या सुमारास शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही रस्ते निर्मनुष्य होत आहेत. साधारणपणे प्रत्येकवर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे मृत्यु होणे संभवनीय असते. सध्या उष्णतेचे प्रमाण महाराष्टÑातील विदर्भ, मराठवाड्यासह धुळे जिल्हयातही वाढलेले आढळून आलेले आहे. उष्माघात झालेल्या रूग्णांना ताताडीने औषोधोपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या उष्माघात कक्षात कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ३० जून १९ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या उष्माघाताचा दैनंदिन अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य विभागाला सादर करावा लागत आहे.

Web Title: Launch of heat-room in 41 health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे