इराणी गँगचे दोघे एलसीबीने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:29 PM2019-12-20T22:29:37+5:302019-12-20T22:30:20+5:30
मध्यप्रदेशात जावून केली कारवाई
धुळे : चेनस्रॅचिंगमध्ये हातखंडा असलेल्या भुसावळ येथील इराणी गँगच्या दोघांना मध्यप्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, त्यांच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़
गेल्या काही दिवसांपासून शहरात चेनस्रॅचिंगच्या घटनांनी अक्षरश: कहर माजविला होता़ त्या पाठोपाठ घरफोडीच्या घटनांनी सुध्दा डोके वर काढले होते़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी गस्त वाढविली होती़ चेनस्रॅचिंगच्या घटनांचा छडा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला केल्या होत्या़ घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर लवकरच चेनस्रॅचिंग करणाºयांना ताब्यात घेतले जाईल, आमचा शोध सुरु आहे असे सांगण्यात आले होते़ त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाची नियुक्ती देखील या कामांसाठी करण्यात आली होती़ पथकाने मध्यप्रदेशातील देवास येथे जावून मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला़ पथकाने सादीकअली इबाबतअली आणि अब्बासअली इबाबतअली शेख (दोन्ही रा़ भुसावळ) यांना शिताफिने ताब्यात घेतले आहे़