एलसीबीने पकडला ३ कोटींचा गांजा; जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: November 3, 2023 05:21 PM2023-11-03T17:21:36+5:302023-11-03T17:21:45+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ कोटी १० हजार रुपये किमतीचा ६ हजार किलो वजनाचा गांजा जप्त केला.
धुळे: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ कोटी १० हजार रुपये किमतीचा ६ हजार किलो वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावशिवारात बुधवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी गुरुवारी शिरपूर तालुका पाेलिस ठाण्यात फरार संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. वर्षभरात आतापर्यंत गांजाची २८ कारवाई करण्यात आली असून ४ कोटी ८२ लाख ७५ हजार ६७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि पथकातील कर्मचारी उपस्थित होते.