धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगेंनी स्विकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:21 PM2017-12-12T16:21:53+5:302017-12-12T16:22:43+5:30
बबन थोरात : पत्रकबाजी नको, विकास हवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात काही लोकप्रतिनिधी केवळ पत्रकबाजी करीत असून ही पध्दत धुळयातच आहे़ मात्र धुळेकर जनतेला पत्रकबाजी नको तर विकास हवा असून शिवसेना त्यासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी केले़
मनपाच्या विरोधी पक्षनेते पदी वैशाली लहामगे यांची निवड झाली़ लहामगे यांनी मंगळवारी पदभार स्विकारला़ सदर कार्यक्रमात थोरात बोलत होते़ या कार्यक्रमाला महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिश महाले, संजय गुजराथी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, महिला बालकल्याण सभापती इंदुमती वाघ, माजी महापौर जयश्री अहिरराव, भुपेंद्र लहामगे, अतुल सोनवणे, प्रा़ शरद पाटील, महेश मिस्तरी, एम़जी़धिवरे, वाल्मिक दामोदर, साबीर शेख, प्रशांत श्रीखंडे उपस्थित होते़ धुळे मनपात महिलाराज आणण्यासाठी शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपदी वैशाली लहामगे यांची निवड करून पहिला मान दिला असल्याचे बबन थोरात म्हणाले़ महापौर कल्पना महाले यांनी वैशाली लहामगे यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले़ तसेच शहराच्या विकासात त्या योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली़ माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी मनपात महिलाराज आणण्याचे आवाहन केले़ मनोज मोरे यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला़ लहामगे यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या़