तापी जलवाहिनीला लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:00 PM2020-04-21T22:00:32+5:302020-04-21T22:00:48+5:30

बाभळे फाटा ते सोनगीर दरम्यान गळती : दररोज लाखो लिटर्स पाण्याची नासाडी

A leak in the Tapi vessel | तापी जलवाहिनीला लागली गळती

तापी जलवाहिनीला लागली गळती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : एप्रिल महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटल्यानंतर आता सूर्य आग ओकायला लागला. ऊन चांगलंच तपायला सुरवात झाली. आगामी दोन महिन्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन महत्वाचे आहे. पाणी जपून वापरणे गरजेचे झाले आहे. मात्र धुळे शहराला पाणी पुरवठा करीत असलेल्या तापी नदीवरील योजनेच्या जलवाहिनीला काही ठिकाणी छोट्या मोठ्या लागलेल्या गळत्यांमधून लाखो लिटर वाया जाणाऱ्या शुद्ध पाण्याकडे महानगर पालिकेचे लक्ष नसल्याचे दिसते.
धुळे शहराला पाणी पुरवठा करीत असलेल्या तापी नदीवरील योजनेच्या जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून बाभळे फाटा ते सोनगीर दरम्यान गळती सुरू आहे. या मधून शुद्ध केलेले खर्चिक लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. दरम्यान वेळोवेळी दुरुस्ती करून देखील त्याच जागी पुन्हा गळती लागत असते.
या मुळे दुरुस्तीच्या कामाच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होतआहे. दरम्यान प्रगतीवर असलेल्या सुलवाडे-जामफळ-कनोली या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून जात असलेल्या या जलवाहिनी स्थलांतर करण्याचे काम सुरू होते.
मात्र कोरोनामुळे हे काम सध्या स्थगित आहे. बुडीत क्षेत्रातील नवीन जलवाहिनी होईल तेव्हा होईल पण सध्या या जुन्या जलवाहिनीच्या गळती मधून लाखो रुपये खर्चिक शुद्ध केलेले लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
पाणीपुरवठा ट्रान्सफार्मरला धोका
दरम्यान जलवाहिन्यांच्या एका गळतीच्या परिसरात सोनगीरसाठी पाणी पुरवठा करीत असलेल्या विहिरीसाठीचे एक्सप्रेस फीडर वीजवाहिनीचे ट्रान्सफर्मर आहे. एखाद्या वेळेस गळती फुटून मोठी झाली तर गळतीचे पाणी ट्रान्सफर्मरवर येऊन त्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष देवून कायमस्वरूपी दुरूस्ती करावी.

Web Title: A leak in the Tapi vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे