‘अक्कलपाडा’चे पाटचारीतून आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:07 PM2019-02-19T22:07:05+5:302019-02-19T22:07:52+5:30

कापडणे ग्रामपंचायत : गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

 Leave the recurrence of 'Akalpada' Patankari | ‘अक्कलपाडा’चे पाटचारीतून आवर्तन सोडा

dhule

Next

कापडणे : येथे ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याचे स्रोत कमी झाल्याने गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहे. यासाठी अक्कलपाडाच्या आवर्तनातून सोनवद धरण भरणाऱ्या पाटचारीला पाणी सोडावे, अशी मागणी येथील ग्रामपंचायततर्फे निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.
सध्या येथे पाच दिवसाआड नळांना पाणी येत आहे. यामुळे येथील ग्रामस्थांची व महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. यापुढे उन्हाळ्यात मार्च-एप्रिल महिन्यात खूपच भीषण टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे.
पाणीटंचाईची दाहकता कमी होण्यासाठी पांझरा नदीला सोडण्यात आलेले अक्कलपाडाच्या आवर्तनातून सोनवद धरण भरणाºया पाटचारीला पाणी सोडावे.
यासंदर्भात कापडणे ग्रामपंचायतचे सरपंच भटू गोरख पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या वतीने सोमवार १८ रोजी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे सोनवद पाटचारीला पाणी सोडण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
कापडणे ग्रामपंचायतच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील कापडणे गाव हे लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहे. येथे पशुंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
पाऊस नसल्याने तीन ते चार वर्षापासून सततचा दुष्काळ असून कापडणे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
अशापरिस्थितीत अक्कलपाडा धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या आवर्तनातून सोनवद पाटचारीत पाणी सोडण्यात यावे. या पाण्यामुळे कापडणे गावाला पाणीपुरवठा करणारे जलस्रोतांची पाण्याची पातळी वाढून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
सदर निवेदनावर सरपंच भटू गोरख पाटील यांची स्वाक्षरी असून निवेदन देताना सरपंचांसह ग्रा.पं. सदस्य राजेंद्र रमेश माळी, उपसरपंच हर्षदा पाटील यांचे प्रतिनिधी भैय्या पाटील, सुमित माळी, मनोज मुरलीधर पाटील, प्रमोद गुलाबराव पाटील, भैया बोरसे आदी पदाधिकाºयांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कापडणे ग्रामपंचायतीचे गटनेते भगवान विनायक पाटील व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल रोहिदास पाटील हे जिल्हाधिकारी यांना भेटून कापडणे पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरा नदीच्या सोनवद प्रकल्पाच्या पाटचारीला पाणी सोडण्याबाबत मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Leave the recurrence of 'Akalpada' Patankari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे