चिकसे येथे बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:10 PM2020-08-19T15:10:11+5:302020-08-19T15:10:24+5:30

पिंपळनेर : दोन बोकड, दोन मेंढ्यांचा पाडला फडशा, भितीचे वातावरण

Leopard attack at Chikse | चिकसे येथे बिबट्याचा हल्ला

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील चिकसे शिवारात सोमवारी पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बिबट्याने घराजवळील गोठ्यातील दोन बोकड, दोन मेंढया अशा चार जनावरांचा फडशा पाडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, तसेच लवकरच वनविभागामार्फत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गावातील बापूजी त्र्यंबक अहिरे यांच्या घराजवळील वाडयातील गोठयात वन्यप्राण्याने हल्ला करीत तेथे बांधलेले दोन बोकड, दोन शेळ्यांचा फडशा पाडला. हा हल्ला बिबट्याने केल्याचा अंदाज वनविभागाने केलेल्या पाहणीनंतर वर्तविला. वन्यप्राणी रहिवासी भागात येऊन हल्ला करीत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिरे हे पहाटे साडेतीन वाजता उठले असता, त्यांना बोकड, बकºया मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य अजय सूर्यवंशी यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण माळके, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. ११ आॅगस्ट रोजीही ताराचंद्र पाताळपुरे यांच्या गांगेश्वर शिवारात गाय, म्हैस, वासरे यांच्यावर बिबट्याने हल्ला करीत त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. याच शिवारातील मातोश्री पोल्ट्री फार्मवरही बिबटयाने हल्ला करीत कोंबड्या खाण्याचा प्रयत्न केला. मात्र जाळीमुळे ते शक्य झाले नाही. तरीही बिबट्याने जाळीवर पंजा मारल्याने भीतीने व आपसात चेंगरून ३८० कोंबड्या मृत झाल्या होत्या. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली होती. सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावून शिवार भयमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. यापूवीर्ही साक्री तालुक्यातील चिकसे, सामोडे, कासारे, कड्याळे, देशशिरवाडे, शेलबारी आदी भागात बिबटयाचा मुक्तसंचार नित्याचाच झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या भागात बिबटयाच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. नियमित घडणाºया अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मागणी करूनही पिंजरा लावण्यात आला नाही. त्यामुळे वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Leopard attack at Chikse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.