साक्री तालुक्यातील नांदवन शिवारात बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:36 PM2018-02-25T12:36:35+5:302018-02-25T12:36:35+5:30
धुळे जिल्हा : दोन शेतकरी गंभीर, बंदोबस्त करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : साक्री तालुक्यातील नांदवन शिवारात बिबट्याने केलेल्या हल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले़ त्यांच्यावर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ बिबट्याचा बंदोबस्त प्रशासनाने कराव अशी मागणी कासारेचे सरपंच विशाल देसले यांनी केली आहे़
नितीन तानाजी देसले (रा़ कासारे ता़ साक्री) व शेतमजूर रतीलाल यादव सोनवणे (रा़ त्रिशूलपाडा ता़ साक्री) हे दोन्ही शेतात गहू कापत असताना बिबट्याने या दोघांवर हल्ला केला. यात दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. घटना लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी ग्रामस्थ धावून आले़ त्यांना लागलीच साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़
दरम्यान, साक्री तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनवभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कासारेचे सरपंच विशाल देसले आणि ग्रामस्थांनी केलेली आहे.