वसमार परिसरात बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:54 PM2019-02-15T21:54:01+5:302019-02-15T21:54:43+5:30

साक्री तालुका : ग्रामस्थांमध्ये भीती, वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी

Leopard communications in the Vazhara area | वसमार परिसरात बिबट्याचा संचार

dhule

Next

म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार परिसरात बिबट्याचा संचार सुरु आहे. बिबट्याच्या हल्यात गेल्या काही दिवसात एक जण जखमीही झाले आहेत. वन विभागाचा याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी वसमार परिसरामध्ये डाबरी शिवारात हिंदळे डोंगरावरती एका डोंगर कपऱ्यात अडकलेल्या बिबट्या बाहेर काढून त्याला लळींग कुरणात सोडण्यात आले होते. त्या घटनेच्या दुसºया दिवशी त्याच ठिकाणी काही अंतरावर हेमराज सोनवणे यांच्या शेतात बिबट्या दिसला. तर तिसºया दिवशी त्याच बिबट्याने हरिष नेरे यांच्यावर हल्ला केला त्यात ते जखमी झाले.
लाठया काठयांचा आधार
ग्रामस्थ शेतात जाताना संरक्षणासाठी लाठ्या हातात घेवून रात्रीच्या वेळी परिसरात वावरताना दिसून येत आहे.
कृत्रिम पाणवठे उभारावे
दुष्काळी स्थिती व त्यामुळे निर्माण होणारी पाण्याची कमतरता त्यामुळे हिंस्रप्राणी मानवी वस्तीत शिरताना दिसत आहे. याबाबत वनविभागाने तातडीने हिंस्र प्राण्याला पिंजºयात जेरबंद करावे. किंवा जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
वीजपुरवठा दिवसा करावा
रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत असते. म्हसदी परिसरात वीज पुरवठा रात्री होत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष द्यावे. आणि वीज पुरवठा हा दिवसा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
डाळिंबाच्या शेतांमध्ये बिबट्या
म्हसदी परिसरात व वसमार शिवारात मोठ्या प्रमाणात डाळिंब क्षेत्र असल्याने बिबट्यासह इतर हिंस्र प्राणी येथे वास्तव्य करणे अधिक सोयीचे ठरत असते.
माजी सरपंच प्रतिनिधी वेंकट नेरे यांच्या डाळिंब बागेजवळ गुरुवारी बिबट्या दिसला. वसमार पुनर्वसन गावाला लागून शेतकरी विक्रम दगा पाटील नेरे यांच्या शेतामध्येही बिबट्या दिसला. तो अक्कलपाडा धरणाकडे पळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी हे तातडीने दाखल झाले होते.

Web Title: Leopard communications in the Vazhara area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे