आठ वनक्षेत्रात बिबट्याचे ‘राज्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:14 PM2020-07-30T22:14:23+5:302020-07-30T22:15:47+5:30

प्राणी गणना : गतवर्षी वन्यप्राणी १०९ तर पक्षी २०९; पक्ष्यांची नोंद, यंदा कोरोनाचा परिणाम

Leopard 'kingdom' in eight forests | आठ वनक्षेत्रात बिबट्याचे ‘राज्य’

dhule

Next
ठळक मुद्देबिबट्यांची संख्या जास्तबुध्दपौर्णिमेच्या रात्री जिल्हयातील ८ वनक्षेत्रात १३ बिबट्या आढळून आले दर चार वर्षानंतर प्राणी गणना केली जाते़ जिल्ह्यात २० ठिकाणी गणना

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात वन विभागाचे आठ वनपरिक्षेत्र आहे़ या वनक्षेत्रातील वेगवेगळ्या पाणवठ्यांवर दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्य प्रकाशात वन्य प्राण्याची गणना केली जात़े़ गतवर्षी यात २०९ वन्यप्राणी, १०९ वन्य पक्षांची नोंद करण्यात आली होती. त्यात पक्ष्यांमध्ये मोरांची संख्या सर्वाधिक ४६ तर बिबटे ३० ते ३५ असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली़
दरवर्षी बुध्दपौणिमेच्या दिवशी वन्य प्राण्याची गणना केली जाते़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून काही ठिकाणी ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वन्य प्राण्याची गणना केली होती़ काही वन्यप्राणी रात्री पाणी पिण्यासाठी रात्री पानवठयावर येत नाही़ त्यामुळे काहींची नोंदणी होत नाही़ त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात कमी-अधिक नोंदणी होऊ शकते़ वन्यपप्राणी गणना करतांना प्राण्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेवून अभयारण्यातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना केली जाते. दिवसा कृत्रिम पाणवठ्यांवर माणसांकडून हस्तक्षेप केला जातो. रात्री हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्रत्यक्ष दिसणाºया प्राण्यांची नोंद घेतली जाते. मात्र, सर्वच प्राणी दररोज पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत नाहीत. तसेच पाणवठ्यावर आलेल्या सर्वच प्राण्यांची नोंद घेता येत नाही. त्यामुळे सध्या इंडेक्स पद्धतीने प्राणी प्रगणना केली जात असल्याची माहिती देण्यात आली़
जिल्ह्यात २० ठिकाणी गणना
धुळे तालुक्यात धाप धरण, गारबर्डी तलाव, हरण्यामाळ तलाव, तिन कोºया, चिंचवन तलाव, एडक्या धरण, नंदाळे, विन्याडोह, गरताड रोपवाटीका, साक्री तालुक्यात नायनदी, अक्कलपाडा, घाणेगाव धरण, शिरपूर तालुक्यातील बोराडी कक्ष ७७३, मालकातर, विरखेल धरण, लाटीपाडा धरण, शेलबारी धरण, ंिंशंदखेडा तालुक्यातील कर्ले, साळवे, खलाणे, शिंंदखेडा, चिमठाणा अशा विविध २० ठिकाणी वन्यप्राण्यांची गणना केली जाते़
गत वर्षी अशी होती संख्या
गत वर्षी १८ ते १९ जून २०१९ या कालावधीत बुध्द पौणिमेला निलगाय १६ , चिंकारा १५ , मोर २०, ससा २०, सायाळ ८, पाणकोंबड्या १०, बगळ े ३०, रानडुक्कर १५ असे एकूण धुळे तालुक्यात १३१ प्राणी आहेत़ लांडगे ३५, ससे १८, मोर ०५, घार ०४, पाणकोबड्या ८, बिबट्या ०२, तरस ३, रानडुक्कर १०, साक्री ८८ , कोल्हा ३ , लांडगे २, तितर ९, रानमांजर ३ , तरस ४ , बोराडी २१, बिबट्या ९ , चिकारा ११, अस्वल ४, रानडूक्कर ८ पिंपळनेर ३२ , बिबट्या २ , मोर २१, लांडगे ५ , कोल्हे ६ , ससे २, हरीण ५, शिंदखेडा ४१ तर जिल्ह्यात वन्यप्राणी २०९ पक्षी १०९ असे एकूण ३१८ वन्यप्राणी नोंद करण्यात आली आहे़ तर यंदा काही प्रमाणात भर पडू शकते़
जिल्ह्यात आढळले हे प्राणी
पाणवठ्यावरील कॅमेºयात बिबट्या, कोल्हा, निलगाय, चिंकारा, मोर, ससा, सायाळ, पाणकोंबड्या, बगळे, रानडुक्कर, लांडगे, तरस, घार, रानमांजर, अस्वल, हरीण असे विविध वन्यप्राणी आढळून आले़
बिबट्यांची संख्या जास्त
वनविभागाकडून बुध्दपौर्णिमेच्या रात्री जिल्हयातील ८ वनक्षेत्रात १३ बिबट्या आढळून आले आहेत़ मात्र जिल्ह्यात बिबट्याची संख्या ३० ते ३५ असल्याचा दावाही वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे़ काही वन्यप्राणी रात्री भ्रमंती करत नसल्याने त्यांची मोजणी होते़ यात कमी अधिक प्रमाण असू शकते असेही त्यांनी सांगितले़
कॅमेरे ट्रॅपिंगद्वारे गणना
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून (एनटीसीए)तर्फे देशभरात दर चार वर्षानंतर प्राणी गणना केली जाते़ महाराष्ट्रात दोन टप्प्यांत ही गणना केली जाते़ प्राण्यांचा अधिवास असलेल्या मर्यादित जागांवर कॅमेरे ‘ट्रॅपिंग’ लावून प्राण्यांची गणना होते़ त्यासाठी त्याक्षेत्रातील तज्ञ स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाते़

Web Title: Leopard 'kingdom' in eight forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे