ग्रामस्थांना ‘कॅशलेस’ व्यवहाराचे धडे

By Admin | Published: January 14, 2017 12:18 AM2017-01-14T00:18:51+5:302017-01-14T00:18:51+5:30

निमगूळ येथील शिबिर : उत्तम पाटील यांनी केले मार्गदर्शन

Lessons of 'cashless' behavior to the villagers | ग्रामस्थांना ‘कॅशलेस’ व्यवहाराचे धडे

ग्रामस्थांना ‘कॅशलेस’ व्यवहाराचे धडे

googlenewsNext


निमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात कॅशलेस व्यवहाराबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील महा ई सेवा केंद्राचे उत्तम सीताराम पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कॅशलेस व्यवहार नेमका कसा करायचा? याविषयी त्यांनी सविस्तर माहिती देत ग्रामस्थांच्या मनातील शंकांचे निरसन केले. यावेळी ग्रामस्थांना कॅशलेस व्यवहारबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. अध्यक्षस्थानी दोंडाईचा अपर तहसील रोहिदास वारुडे, स्टेट बॅँकेचे व्यवस्थापक रजनीकांत तिवारी, मंडळ अधिकारी एम. एम. शास्त्री, तलाठी संगीता प्रकाश राजपूत, तलाठी डी. ए. भगत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव बागल, रोटरीचे अध्यक्ष लक्ष्मण वाघ, उपसरपंच दीपक बागल, ग्रामपंचायत सदस्य डॉ. वीरेंद्र बागल, हर्षवर्धन बागुल, आनंद शिरसाठ, हितेंद्र बागल, वसंतराव बागल उपस्थित होते.                  सूत्रसंचालन हितेंद्र बागल यांनी केले. आभार वसंतराव वागल यांनी मानले.

Web Title: Lessons of 'cashless' behavior to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.