पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; धुळे न्यायालयाचा निकाल, दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा

By अतुल जोशी | Published: February 14, 2024 06:41 PM2024-02-14T18:41:08+5:302024-02-14T18:41:19+5:30

लेबर कॉलनी भागात किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा लोखंडी फावड्याने खून केला होता.

Life imprisonment for husband in wife's murder case Dhule court verdict, 1 month hard labor in default of fine | पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; धुळे न्यायालयाचा निकाल, दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; धुळे न्यायालयाचा निकाल, दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा

धुळे: शहरातील लेबर कॉलनी भागात किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा लोखंडी फावड्याने खून केला होता. याप्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एल. भागवत यांनी आरोपी सुरेंद्र बारकू सोरेन ऊर्फ चंद्राई लक्ष्मीनारायण मुरमू (वय ४५) यास जन्मठेपेसह एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरीचा शिक्षा सुनावली.

सांजिली सुरेंद्र सोरेन व तिचा पती सुरेंद्र सोरेन ऊर्फ चंद्राई लक्ष्मीनारायण मुरमू हे दाम्पत्य दि.५ सप्टेंबर २०१८ रोजी चक्करबर्डी येथे सुरू असलेल्या बांधकामावर कामासाठी आले होते. ते लेबर कॉलनीतील सांजिली सोरेन हिच्या भावाच्या घरी आल्यानंतर रात्री घरात झोपले होते. सांजिली व पती सुरेंद्र सोरेन यांच्यात किरकोळ भांडण झाले.

या भांडणात सुरेंद्र सोरेन याने सांजिली हिच्या डोक्यात लोखंडी फावडीने वार करून तिची निघृण हत्या केली. ही घटना ६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मृत सांजिलीचा भाऊ मोहन मुरमू याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र सोरेनविरुद्ध भादंवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गणेश वाय पाटील यांनी युक्तीवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एल. भागवत यांनी आरोपी सुरेंद्र सोरेन यास खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप, तसेच १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरीचा शिक्षा असा निकाल दिला आहे. 

Web Title: Life imprisonment for husband in wife's murder case Dhule court verdict, 1 month hard labor in default of fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.