धुळे महापालिकेत ‘लिफ्ट’चे काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:36 PM2019-04-18T21:36:15+5:302019-04-18T21:36:35+5:30
स्वतंत्र दोन ठिकाणी व्यवस्था : लवकरच सुरु होण्याचे संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या नुतन इमारतीत ‘लिफ्ट’ बसविण्याचे काम महिन्याभरापासून सुरु आहे़ आता ते अंतिम टप्प्यात आले असून लवकरच कार्यान्वित होणार आहे़ दोन स्वतंत्र लिफ्टसाठी सुमारे ४० लाखांचा खर्च झालेला आहे़
जुन्या इमारतीत नगरपालिका कार्यान्वित असतानाच २००३ मध्ये नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले़ साहजिकच सर्वच कामांचा भार वाढला़ त्यातच शहराचा विस्तार देखील वाढला़ शहरालगतची गावे महापालिकेत वर्ग करण्यात आले आहेत़ जुनी इमारत प्रशासकीयदृष्ट्या सोयीस्कर नसल्याने महापालिकेच्या शाळा नंबर एक येथे नुतन इमारत बांधण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला़ टप्प्या-टप्प्याने काम मार्गी लावत असताना आता या इमारतीत महापालिकेचा कारभार सुरुही झाला आहे़ अधिकारी आणि पदाधिकारी यांचे स्वतंत्र दालन आणि कर्मचाºयांसाठी देखील स्वतंत्र्य व्यवस्था मार्गी लावण्यात आलेली आहे़
सर्व काही असताना तीन मजली इमारतीत ‘लिफ्ट’ची सोय करण्यात आली होती़ परंतु तिचे बांधकाम अपूर्ण होते़ गेल्या महिन्याभरापासून नव्या ‘लिफ्ट’चे काम सुरु झाले असून आता हेच काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे़ अंदाजे १५ दिवसांत काम मार्गी लागून ‘लिफ्ट’ची सुविधा अधिकारी, पदाधिकाºयांसह सर्व सामान्य नागरीकांना मिळू शकेल़
‘लिफ्ट’ उभारणीचे काम मुंबई येथील ओटीस कंपनीला देण्यात आले आहे़ प्रत्येकी २० लाखांप्रमाणे दोन ‘लिफ्ट’ तयार करण्यात येत आहे़ ८ टन वजन अर्थात एका वेळेस १० जणांना ‘लिफ्ट’ची सुविधा मिळू शकेल़
‘लिफ्ट’ तयार झाल्यानंतर पुढील ३ वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे़ अत्याधुनिक अशी ‘लिफ्ट’ महापालिकेत बसविण्यात येत असल्याने ती केव्हा सुरु होईल, याचीच उत्सुकता आता नागरीकांना लागली आहे़