मद्यविक्रीची दुकाने आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:14 PM2018-12-07T23:14:57+5:302018-12-07T23:15:34+5:30

शहरासह २५ किलोमीटर आतील सर्व मद्यविक्रीच्या दुकानांना हा आदेश लागू

Liquor shops are closed from today | मद्यविक्रीची दुकाने आजपासून बंद

मद्यविक्रीची दुकाने आजपासून बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून  ९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून १० रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबरच्या संध्याकाळी ५ वाजेपासून ते मतदान व मतमोजणी रोजी संपूर्ण दिवस मनपा हद्दीतील व हद्दीपासून २५ कि.मी. आतील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. 
राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबईचे आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा हद्दीपासून २५ कि.मी. आतील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद  ठेवण्याचे निर्देश  दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मुंबई दारूबंदी कायद्यान्वये जिल्हाधिकारी रेखावार यांनी हे आदेश दिले आहेत. संबंधित दुकानदारांनी वरील कालावधीत मद्य दुकाने (अनुज्ञप्ती) उघडी ठेवू नयेत. तसेच विक्री व अन्य व्यवहार करू नयेत. बंदच्या दिवशी दुकाने उघडी आढळल्यास त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला  आहे. 
जमावबंदी आदेश
महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ रोजी मतदान तर १० रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) मनाई आदेश  लागू राहतील. निवडणुकीतील मतदानासाठी ९ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत किंवा निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मतदान केंद्र, मतदान बूथ व १० रोजी मतमोजणी ठिकाण शासकीय धान्य गोदाम, केंद्रीय विद्यालयाजवळ, नगाव बारी देवपूर येथील १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्याबाबत कळविले. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी मिसाळ यांनी मनाईचा आदेश लागू केला आहे.

Web Title: Liquor shops are closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे