संत साहित्यामुळेच मराठी भाषेत जिवंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:58 PM2018-12-30T22:58:03+5:302018-12-30T22:58:22+5:30

डॉ़.रामचंद्र देखणे : वि़ का़राजवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रतिपादन 

Living in Marathi language due to Saint literature | संत साहित्यामुळेच मराठी भाषेत जिवंत 

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. ती परंपरा आणि मराठी भाषेवरील प्रेम याचे जवळचे नाते होते़ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीमुळे मराठी भाषा जिवंत आहे़, असे प्रतिपादन  शहरातील भट सभागृृहात आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ साहित्यिक डॉ़रामचंद्र देखणे यांनी केले़ 
शहरातील भट स्मृती सभागृृहात इतिहासाचार्य विक़ा़ राजवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अध्यक्षस्थानी राजवाडे संशोधन मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा होते. तर व्यासपीठावर जयश्री शाह, लता आगीवाल, सर्जेराव भामरे, संजय मुंदडा आदी उपस्थित होते. 
महाराष्ट्रात संत, कलांवत, आणि समाजसुधारक यांचे योगदान महत्वाचे आहे़ संतांच्या अभंग, कीर्तनातून समाज घडला तर कलावंतांचा कलेतुन समाजात जनजागृती झाली. समाजसुधारक यांनी समाज प्रबोधनासाठी केलेले कार्य, बलीदान समाजात प्रेरणा निर्माण करू शकला  ज्ञानेश्वरी ग्रंथांचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले असते़ नोबेल पुरस्कार याच मराठी ग्रंथाला मिळाला असता़ त्यामुळे जगातले सर्वच साहित्यिक, शास्त्रज्ञ आज महाराष्ट्रातील राहीले असते. पुणे शहराला ज्याप्रमाणे संस्कृतीचा वारसा लाभला आहे़ त्याप्रमाणे खान्देशात धुळे शहराला लाभला आहे़  वि. का राजवाडे यांनी केवळ इतिहास लिहिला नाही तो तर सर्वसामान्यांपर्यत व जगाच्या कान्या-कोपºयात इतिहास पोहचविण्यासाठी इतिहास संशोधन मंडळांच्या माध्यमातून चिरकाल टिकवून ठेवला, म्हणुन आजच्या क्षणापर्यंत कायम आहे़  इतिहासाचार्य उत्तम गणिततज्ञ होते, असे डॉ. देखणे यांनी सांगितले़
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मुंदडा यांनी तर सूत्रसंचालन प्रा.विलास चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात डॉ. देखणे यांच्या हस्ते  विक़ा़ राजवाडे मासिक व साहित्य संपदा ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले़

Web Title: Living in Marathi language due to Saint literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे