शपथपत्र न भरल्याने शेतकºयांपुढे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:12 AM2017-08-04T11:12:24+5:302017-08-04T11:14:25+5:30

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना : १७ शेतकºयांनाच आतापर्यंत लाभ

loan proble of formar in dhule district | शपथपत्र न भरल्याने शेतकºयांपुढे अडचणी

शपथपत्र न भरल्याने शेतकºयांपुढे अडचणी

Next
ठळक मुद्देलाभ मिळालेले शेतकरी राष्टÑीकृत बॅँकेचे कर्जदार शासनाने शपथपत्र भरून देण्याचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत केवळ १७ शेतकºयांनीच शपथपत्र भरून दिल्यामुळे त्यांना दहा हजार रुपयांची उचल देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली. हे सर्व १७ शेजिल्हा बॅँकेच्या ९० शाखांमध्ये ३८ हजार शपथपत्रांचे वितरण धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की बॅँकेच्या धुळे येथील शाखांमध्ये २३ हजार तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकºयांना दहा हजार रुपयांची उचल देण्यासाठी आमची सकारात्मक भूमिका आहे. परंतु, शासनानेच दिलेल्या निर्देशानुसार शेतकºयांना त्यासाठी शपथपत्र भरून देणे अनिवार्य आहे. शेतकºयांची गैरसोय होऊ नये, म्हणून आम्ही आमच्या सर्व शाखांमध्ये ३८ हजार शपथपत्रांचे वाटप केले

आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाने शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी जाहीर करून  कर्जदार शेतकºयांनी शपथपत्र भरल्यानंतर त्यांना तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याबाबत अध्यादेश दिला होता. मात्र,  जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी आतापर्यंत शपथपत्रच भरून बॅँकांकडे दिलेले नाही. परिणामी, त्यांना दहा हजार रुपयांची उचल देण्यास बॅँकांना अडचणी येत असल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १७ शेतकºयांनीच शपथपत्र भरून दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे. 
शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.  त्यानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याचे आदेश बॅँकांना दिले. परंतु, बॅँकस्तरावर दहा हजार रुपये दिले जात नसल्याचे सांगून भाजपाच्या पदाधिकाºयांनी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेसमोर बुधवारी  व गुरुवार आंदोलन केले.  प्रश्न त्वरित न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा पदाधिकाºयांनी दिला होता. 

Web Title: loan proble of formar in dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.