धुळ्यात ३१ मे पर्यंत वाढविला लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:54 PM2020-05-21T20:54:31+5:302020-05-21T20:54:58+5:30

जिल्हाधिकारी : अत्यावश्यक सेवामध्ये वाढ

Lockdown extended till May 31 in Dhule | धुळ्यात ३१ मे पर्यंत वाढविला लॉकडाउन

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका हद्दीत ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला़ जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आदेश पारीत केले़
कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून महापालिका क्षेत्रात १८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या अनुषंगाने २२ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपासून ते ३१ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़
या कालावधीत किराणा दुकाने, स्वस्त धान्य, दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने, छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट/कव्हरची दुकाने, वखार (सॉ मिल), कुलर, एसी, पंखे साहित्याची दुकाने, दूध विक्रेते, गॅस एजन्सी व पेट्रोलपंपचालकांसाठी सकाळी ९ ते दुपारी २ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Lockdown extended till May 31 in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे