लॉकडाउनचा फज्जा, पोलिसांकडून प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:50 PM2020-05-05T21:50:45+5:302020-05-05T21:51:03+5:30
कोरोनाचा धसका : आग्रा रोडवर विनाकारण गर्दी, लहान पुलावरही वाहतुकीची कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रयत्न सुरु असून त्यासाठी लॉकडाउन करण्यात आलेला आहे़ अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही फिरण्यास मनाई आहे़ असे असताना आदेशाचे उल्लंघन करीत बिनधास्त बाजारपेठेत फिरणाऱ्यांना मंगळवारी पोलिसांनी प्रसाद दिला़ स्वत: डीवायएसपी सचिन हिरे यांना काठी हातात घेण्याची वेळ आली़
लॉकडाउनचा फायदाच काय
कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे़ यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही़ त्यांच्यावर निर्बंध लावत सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे़ त्याची अंमलबजावणी धुळ्यात होत आहे़ पण, अपेक्षित प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे़ संचारबंदी लावल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात आली खरी पण, सद्यस्थितीत त्याच्यात शिथीलता आलेली दिसत आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाउन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ पोलीस देखील ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेतच दिसत असल्याने बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे म्हणावे लागेल़ विविध ठिकाणी गर्दी दिसून येते़ त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे़
सौम्य लाठीचार्ज
शहरातील पारोळा रोडसह आग्रा रोडवर सोमवारी सकाळी अचानक गर्दी झाली होती़ संचारबंदीत सकाळी मिळणारी सूट लक्षात घेता अनेकांनी आग्रा रोडवर धाव घेतली होती़ परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी सुरुवातीला गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला़ पण, कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला़ या गर्दीत कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणाºयांची संख्या अधिक होती़ त्यामुळे काही काळ या भागात पळापळ झाली होती़ अनेकांनी हे पाहून तिकडे फिरकलेच नाही़
४धुळ्यात लॉकडाउन घोषित झाल्यापासून लहान पूल हा एकच वर्दळीसाठी सुरु होता़ यावर गर्दी वाढत असल्यामुळे कालिका माता मंदिराजवळचा पूल सुरु करण्यात आला़ एकेरी वाहतूक वळविण्यात आली़ तरी देखील सकाळच्या वेळेस लहान पुलावर प्रचंड गर्दी होत असते़ यावर नियंत्रण मिळवायला हवे़
ठिकठिकाणी कारवाई झाली पाहीजे
शहरातील बहुसंख्य ठिकाणी नागरीकांचा काही कारण नसताना बिनधास्त वावर दिसून येतो़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असताना नागरीकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे़ मात्र, काही लोकांमुळे पोलिसांना काठीचा वापर करावा लागत आहे़ ही कारवाई सर्वत्र करण्याची आवश्यकता आहे़