४८ तासांसाठी जुने धुळे परिसर लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:09 PM2020-04-15T22:09:22+5:302020-04-15T22:10:03+5:30
८, ९ व १० प्रभाग लॉकडाउन केला
धुळे : साक्री व मालेगाव शहरात कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे़ खबरदार म्हणून मनपाकडून शहरात पायलट प्राजेक्ट राबविण्याचा निर्णय आहे़ बुधवारी ४८ तासांसाठी पहिल्या टप्यात जुन्या धुळ्यातील ८, ९ व १० प्रभाग लॉकडाउन केला होता़ त्यामुळे या परिसरात शुकशुकाट दिसुन आला होतो़
मालेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्येत वाढ हात आहे़ भविष्यात एखादा कोरोना बाधित रूग्ण शहरात आल्यास तो परिसर लॉकडाउन करावा लागू शकतो़ या काळात नागरिकांना गैरसोय होऊ नये़ यासाठी पुर्वनियोजनासाठी शहरातील प्रत्येक प्रभाग दोन दिवसासाठी शंभर टक्के लॉकडाउन केले जात आहे़ पहिल्या दिवशी जुने धुळे परिसर, मच्छिबाजार, मौलवीगंज हा भाग लॉकडाउन करण्यात आल आहे़
जीवनावश्यक वस्तू घरपोच
लॉकडाउनच्या दोन दिवसाच्या काळात नागरिकांनी बाहेर संचार करू नये़ तसेच गैरसोय टाळण्यासाठी एक दिवसआधी किराणा, मेडिकल, दुध, रेशन दुकानदारांचे संपर्क क्रमांकाची यादी प्रसिध्द करण्यात आली होती़
चोख पोलिस बंदोबस्त
नागरिकांना दोन दिवस घरात राहण्याची सवय होण्यासाठी तीनही प्रभाग कळकळीने बंद ठेवण्यात आला होतो़ कॉलनी भागात बॅरीकेटस् लावुन बंद करण्यात आला आहे़ तर ठिक-ठिकाणी बंदोबस्त तैनाद होता़
केवळ अत्यावश्यक प्रवेश
प्रभागात वर्दळ होऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना ओळखपत्र दाखविल्यांनतर सोडण्यात येत होते़ तर फेरफटका मारणाऱ्यांना पोलिसांचा दंडूका खावा लागला़ त्यामुळे बुधवारी शुकशुकाट दिसून आला़