शिंदखेडा गटविकास अधिकारी कार्यालयाला लावले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 04:33 PM2017-06-29T16:33:31+5:302017-06-29T16:33:31+5:30
पं स सभागृह व गटविकास अधीकारी कार्यालयाला सदस्यांनी टाळे ठोकले
Next
ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा,दि.29- शिंदखेडा येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकारी येत नसल्याच्या निषेधार्थ सदस्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी व पंचायत समितीच्या सभागृहाला कुलूप ठोकले.
पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी होती. मात्र या सभेला अधिकारी उपस्थित नव्हते. मासिक सभेच्या दिवशी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीचे आयोजन करून अधिका:यांना बोलवत असतात. त्याचा निषेध म्हणून उपसभापती सुनिता निकम, पं.स.सदस्य शानाभाऊ सोनवणे, राष्ट्रवादीचे मनोहर देवरे यांच्यासह सहा सदस्यांनी सभागृहाला कुलूप ठेकले. बैठकीला 60 टक्के अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचा आरोप सदस्यांनी केला. मात्र प्रभारी साहाय्यक गटविकास अधिकारी मनिप पवार यांनी फक्त बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी वगळता प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे सांगितले.