कर्मचाऱ्यांवर यंत्रांची ‘नजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:15 PM2019-10-07T14:15:39+5:302019-10-07T14:15:54+5:30

महापालिका : माहिती अपलोडिंगचे काम सुरू

'Look' of machines at employees | कर्मचाऱ्यांवर यंत्रांची ‘नजर’

dhule

Next

धुळे : महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी आता बायोमॅट्रिक पध्दतीने होणार आहे़ त्यासाठी कर्मचाºयांची माहिती व हाताच्या अंगठ्यांचा ठसे घेण्यात येत आहे़ यामुळे आता कामकाजात पारदर्शकता येणार आहे़
आता कामानुसार मोबदला
मनपाच्या स्वच्छता विभागात कायम, रोजंदारी व बदली कामगार मिळून एकूण ७०० ते ७५० सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यात १० स्वच्छता निरीक्षकांचा समावेश आहे़ शहरातील दहा भागातील स्वच्छतेची जबाबदारी ६० ते ७० कर्मचाºयांना देण्यात आले आहे़ त्या कर्मचाºयांनी अधिकाºयांकडून त्या ठिकाणी हजेरी घेण्यात येत होती़ थम्ब मशिनव्दारे आता कामाचा योग्य मोबदला व वेळेवर महापालिकेचे लक्ष राहणार आहे़
कामात पारदर्शकता
कामावर नसलेल्या कर्मचाºयांवर पगार काढण्याचा प्रकार यापुर्वी महापालिकेत घडला आहे़ त्यासाठी सदस्यांनी कारवाईची मागणी देखील सदस्यांनी केली होती़ त्यानुसार बºयाच वर्षापासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लावण्यात आला आहे़ या निर्णयानुसार थम्ब मशिनने हजेरी लागणार आहे. तर दांडी मारणाºया कामगारांवर देखील लक्ष राहणार आहे़ बोटाचे ठसे व माहिती फिडीगचे काम सुरु आहे.
पुन्हा बायोमॅट्रीकवर हजेरी
सन २०१२ मध्ये देखील मनपा प्रशासनाने स्वच्छता कामगारांची बायोमॅट्रीक हजेरी सुरु केली होती. मात्र, यंत्रातच बिघाड झाल्याने बायोमॅट्रीक हजेरी बंद होती. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या निमित्ताने २०१७ मध्ये प्रशासनाने बायोमॅट्रीक हजेरी सुरु केली होती. पुन्हा बायोमॅट्रीक हजेरी सुरू करण्यात आली आहे़
स्वच्छता मोहिमेचा मुहूर्त
स्वच्छता हीच सेवा मोहिमेअंर्तर्गत शहरात मोहिम राबविण्यात येत आहे़ त्यानुसार अभियानाअंतर्गंत शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचाविण्यासह मूल्यमापन करुन गुणानुक्रम ठरविण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण होत आहे. मनपा स्वच्छता ही सेवा आणि प्लास्टीक मुक्त शहर हे उपक्रम राबविले जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून स्वच्छता विभागातील कामगारांची बायोमॅट्रीक हजेरीला सुरूवात केली आहे़ त्यामुळे भविष्यात कामाचा पारदर्शकता येणार आहे़ त्यामुळे नियमित कामावर येणाºया कर्मचाºयांना दिलासा मिळणार आहे़

Web Title: 'Look' of machines at employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे