अवकाळीमुळे रब्बीचे नुकसान, वीज पडून तीन बैल ठार
By अतुल जोशी | Published: March 5, 2023 07:12 PM2023-03-05T19:12:13+5:302023-03-05T19:13:15+5:30
पळासनेर परिसरात गारपीट झाली.
अतुल जोशी, धुळे- शनिवारी रात्री शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान वीज पडून सांगवी मंडळात एक तर शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथे दोन बैलांचा मृत्यू झाला. पळासनेर परिसरात गारपीट झाली.
शनिवारी दुपारपासूनच शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शिरपूर शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्याने जोरदार पावसाने हजेरी लावली. शिरपूर तालुक्यात गहू, मका, केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सांगवी येथे वीज अंगावर पडल्याने, बैलाचा मृत्यू झाला. तर शिंदखेडा तालुक्यातही वादळी पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान केले. गहू, मका पिक आडवे पडले. तर वरझडी (ता. शिंदखेडा) येथे चिंधा पंडीत माळी यांची बैलजोडी मृत पावली. दरम्यान नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"