शिवाजी मार्केट सील केल्याने सहा दिवसांत 72 लाख रूपयांचे नुकसान
By Admin | Published: April 3, 2017 05:15 PM2017-04-03T17:15:16+5:302017-04-03T17:15:16+5:30
धुळे महापालिकेच्या थकीत रकमेसाठी शिवाजी मार्केट सील केल्यामुळे सात दिवसात 72 लाखांचे नुकसान झाले आहे.
धुळे, दि.3- शहरातील पाचकंदिल परिसरात असलेल्या मनपाच्या शंकर व शिवाजी मार्केटला प्रशासनाने थकीत दुकानभाडे वसुल करण्यासाठी 29 मार्चला ‘सील’ ठोकले होत़े दरम्यान, शंकर मार्केट दोन दिवसाने उघडण्यात आले असले तरी शिवाजी मार्केट सहा दिवसांपासून ‘सील’ असून त्यामुळे आतार्पयत सरासरी 72 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मार्केटच्या व्यावसायिकांनी दिली़ मनपाच्या या कारवाईविरोधात व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली आह़े
दररोज 12 लाखांचे नुकसान!
मनपाने चेट्रिचंड, रामनवमी यांसारख्या सणासुदीच्या काळात कारवाई केल्याने दररोज 10 ते 12 लाख रूपयांचे नुकसान होत असून आतार्पयत 6 दिवसांत 70 ते 72 लाख रूपयांचे नुकसान झाले, असे व्यावसायिकांचे म्हणणे आह़े त्याचप्रमाणे मनपाचा प्रत्येक अधिकारी थकबाकीची रक्कम वेगवेगळी सांगत असल्याने विश्वास कसा ठेवायचा, असेही व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केल़े
चार वर्षापासूनची आकारणी!
शिवाजी मार्केटमधील 68 ओटय़ांची मुदत 31 ऑक्टोबर 2013 ला संपुष्टात आली आह़े मनपाच्या ठरावानुसार गाळेधारकांना रेडीरेकनर दरानुसार भाडेआकारणी करण्यात येत असून करार संपलेले असल्यास रेडीरेकनर दराच्या दुप्पट आकारणी केली जात़े त्यानुसार 2013 पासून आकारणी करण्यात आल्याने 3 कोटी 29 लाख 75 हजार 108 रूपयांची रक्कम शिवाजी मार्केटच्या ओटेधारकांकडे थकीत असल्याचे मनपा बाजार विभागाने स्पष्ट केल़े