जेवणापूर्वीच मायलेकींवर काळाचा घाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 10:46 PM2018-06-03T22:46:11+5:302018-06-03T22:46:11+5:30

आई अनिता होती गरोदर : महिन्यापूर्वीच धुळे तालुक्यातील वरखेडे येथे आले होते वास्तव्याला

Before lunch, blacklisting of myelike | जेवणापूर्वीच मायलेकींवर काळाचा घाला 

जेवणापूर्वीच मायलेकींवर काळाचा घाला 

Next
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यूनशीब बलवत्तर म्हणून कर्ता पुरूष बचावलादुर्दैवी घटनेने समाजमन हळहळले 

सुरेश विसपुते । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुलींसाठी आईने संध्याकाळी भात, भाजी-भाकरी असा स्वयंपाक करून ठेवला होता. मात्र त्याचा आस्वाद घेण्यापूर्वीच आईसह तीन बालिकांवर काळाने घाला घातला. यातील आई अनिता चौथ्यांदा गरोदर होती. शहरापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या वरखेडी येथे शनिवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. गावालगतच्या शेतात वास्तव्याला असलेल्या पावरा कुटुंबातील या चार मायलेकींचा चिंचेच्या झाडाखाली दबून झालेल्या मृत्यूने समाजमनाला चटका बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.  
शनिवारी संध्याकाळी परिसरात पाऊस होईल अशी अपेक्षा नसताना थोड्याच वेळात वातावरण तयार होऊन संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्या मागोमाग घोंगावत आलेल्या चक्रीवादळामुळे तासाभरात होत्याचे नव्हते केले. अनेक झाडे कोसळली. त्यात शेतकरी प्रभाकर गुजर यांच्या गावालगत असलेल्या चिंचेच्या झाडाचाही समावेश होता. 
महिनाभरापूर्वीच दादूराम जामा पावरा (३२) हा सालदार म्हणून प्रभाकर  गुजर यांच्याकडे रुजू झाला होता. त्याच्यासोबत पत्नी अनिता (२८) व वशिला पावरा (३), पिंकी पावरा (२) व रोशनी (१) या तीन मुली  येथे राहण्यास आल्या. शेतातच चिंचेच्या मोठ्या झाडालगत तुरकाठ्यांच्या भिंंती उभारून सिमेंट पोलच्या आधाराने पत्र्याचे घर उभे राहिले. त्यात पावरा कुटुंब राहत होते. वशिला वगळता पिंकी व रोशनी यांना अद्याप समजही आलेली नव्हती. आई-वडील शेतात काम करत तेव्हा वशिला या दोघी बहिणींना सांभाळत असे. शनिवारी संध्याकाळी काम आटोपल्यानंतर अनिताने मुलींसाठी भात, भाजी व भाकरी असा स्वयंपाक केला. थोड्या वेळाने जेवण करू असा विचार करून अनिता घरात लोखंडी खाटेवर विसावली होती. तिच्या तिघी लेकीही तिच्याजवळच होत्या.
 दमल्याने दादूरामही घरात बसला होता. वादळी पाऊस होईल, असे एकही चिन्ह नव्हते. 
चक्रीवादळ काळ बनून आले 
मात्र सात वाजेच्या सुमारास अचानक वातावरणाचा नूर बदलला आणि सोसाट्याचे वारे वाहू लागले. हा हा म्हणता ढग जमून पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात वादळी वारे घोंगावू लागले. वादळाचे रूपांतर चक्रीवादळात झाले. त्यात परिसरातील अनेक झाडे कोसळली, मोठमोठ्या फांद्या मोडून पडल्या. त्यापैकी एक असलेले प्रभाकर गुजर यांच्या शेतातील चिंचेचे जीर्ण झाड कडाडऽऽ..असा आवाज करून दादूराम पावराच्या घरावर कोसळले. वादळामुळे ते जोराने खाली घरावर कोसळले. त्याखाली दबून अनिता व तिच्या तिन्ही लेकींचा जागीच मृत्यू ओढवला. खाटेशेजारी बसलेला दादूरामही झाडाखाली दाबला गेला होता. जोरदार पावसातही तो सुटकेसाठी मोठ्याने आवाज देत होता. 
त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याचवेळी शेतमालक गुजर यांचा भाऊ प्रल्हाद तेथे आला. दादूरामचा आवाज ऐकून त्याच्या मदतीला धावला. त्याची कशीबशी झाडाखालून सुटका करून घेत ग्रामस्थांना बोलविले. मात्र तत्पूर्वीच अनिता व तिच्या मुलींचा मृत्यू झाला होता. अखेर झाडाखालून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 
परिसरातील बहुतांश शेतांवर पावरांचे वास्तव्य 
स्थानिक सालदार मिळेनासे किंवा परवडेनासे झाल्याने शेतकरी पावरा लोकांना प्राधान्य देऊ लागले आहेत. वरखेडी परिसरात शेतांमध्ये अशी अनेक पावरा कुटुंबे वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. ते कुटुंबासह शेतातच राहत असल्याने सर्व कामे वेळेवर व विनासायास होतात, असा शेतकºयांचा अनुभव आहे. या घटनेमुळे उर्वरित कुटुंबांना अतीव दु:ख झाले आहे. 

 

Web Title: Before lunch, blacklisting of myelike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.