लक्झरीतून मुंबईत जाणारा गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:21 PM2019-08-30T17:21:56+5:302019-08-30T17:22:35+5:30
सोनगीरनजिक कारवाई : ३० किलो मुद्देमाल
धुळे : लक्झरी बसमधून मुंबईला नेला जाणारा गांजा सोनगीर पोलिसांनी सापळा रचून पकडला़ ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाली़ याप्रकरणी मध्यप्रदेशातील एकाला ताब्यात घेण्यात आले़
मध्यप्रदेशातून धुळेमार्गे मुंबईला गांजा नेला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना मिळाली़ ही माहिती त्यांनी सोनगीर पोलिसांना दिली़ याशिवाय कारवाईबाबत मार्गदर्शनही केले़ त्यानुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर गावाच्या शिवारात सहायक पोलीस निरीक्षक सारीका कोडापे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, हेड कॉन्स्टेबल अहिरे, पोलीस कर्मचारी शिरीश भदाणे, सदेसिंग चव्हाण यांनी नाकाबंदी केली़ मध्यप्रदेशातून येणाºया वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरु केले़ पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास रॉयल स्टारच्या एमपी ०९ एसए ९९१० क्रमांकाची लक्झरी येताच ती अडविण्यात आली़ या लक्झरीची तपासणी केली असता लक्झरीच्या डिक्कीत दोन गोण्या आढळून आल्या़ गोण्यामध्ये सुमारे ३० किलो वजनाचा पोलिसांना गांजा आढळून आला़ यानंतर पोलिसांनी मनोज सोळंकी (पावरा) (रा़ सेंधवा) याला ताब्यात घेतले आहे़