पध्दतशीरपणे कापले गॅस कटरने मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 08:05 PM2018-11-05T20:05:24+5:302018-11-05T20:07:32+5:30
धुळ्यातील एटीएम चोरी प्रकरण : जुन्या नोटाही गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : एटीएम चोरी प्रकरणातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले असून त्यात एक पांढºया रंगाचे पिकअप व्हॅन असल्याचे दिसत आहे़ पोलिसांकडून आता त्या वाहनाचा तपास सुरु झाला आहे़ चोरीला गेलेले एटीएम पध्दतशीरपणे कापून त्यातील सर्व नोटा लंपास केल्या असल्याचे समोर येत आहे़ चोरट्यांच्या मागावर पोलीस आहेत़ दरम्यान, याप्रकरणी दोन संशयितांची चौकशी सुरु असल्याचे समजते़
आयसीआयसीआय बँकेचे दोन एटीएम मशिन अग्रसेन चौकातील आस्था हॉस्पिटलसमोर असलेल्या एका गाळ्यात आहेत़ चोरट्यांनी यातील एका मशिनमधून पैशांची लूट न करता थेट ते मशिनच जमिनीपासून वेगळे करून चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती़ त्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मशिनच चोरीला गेल्याचे समोर आले़ याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर राहुड घाटापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या मालेगाव तालुक्यातील वाके शिवारात चोरलेले एटीएम मशिन फेकलेल्या अवस्थेत आढळून आले होते़ हे मशिन गॅस कटरचा आधार घेऊन पध्दतशीरपणे फोडण्यात आले असल्याचे समोर आले आहे़ यातील सर्व जुन्या-नव्या नोटा गायब झाल्या आहेत़ तसेच मालेगाव रोडवरील ज्या ठिकाणी एटीएम मशिन होते तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी मिळविले आहेत़ त्यानुसार ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजून ४८ मिनीटांच्या सुमारास घडली आहे़ याठिकाणी एका व्यक्तीसह पांढºया रंगाचे पिकअप व्हॅन दिसत आहे़ आता पोलीस त्या पिकअप व्हॅनच्या शोधात असून चोरट्यांच्या मागावर आहेत़