महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकास पाच लाखांची लाच भोवली, एसीबीची रात्रीची कारवाई

By देवेंद्र पाठक | Published: August 18, 2023 05:33 PM2023-08-18T17:33:48+5:302023-08-18T17:34:28+5:30

गाळ्याची अनामत रक्कम तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती.

Mahalakshmi Credit Union's employee was bribed with five lakhs, night operation of ACB at bus stand in Dhule | महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकास पाच लाखांची लाच भोवली, एसीबीची रात्रीची कारवाई

महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकास पाच लाखांची लाच भोवली, एसीबीची रात्रीची कारवाई

googlenewsNext

धुळे : सावदा येथील महालक्ष्मी पतसंस्थेचे अवसायक सखाराम कडू ठाकरे (वय ५६) यांना पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई धुळ्यातील बसस्थानकात गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास करण्यात आली. गाळ्याची अनामत रक्कम तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावदा येथील नगरपरिषद व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम तक्रारदार यांचे नावे वर्ग करून देण्यासाठी यावल येथील महालक्ष्मी पतसंस्थेचे अवसायक सखाराम ठाकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजता करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी सखाराम ठाकरे हे विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया) धुळे, अतिरिक्त कार्यभार विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक) जळगाव संस्था, जळगाव तथा अवसायक, महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यावल जि. जळगाव येथे कार्यरत आहे. सध्या ते ११ राधेय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पाचोरा जिल्हा जळगाव येथे वास्तव्याला आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, कर्मचारी राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक सुधीर मोरे या पथकाने केली. धुळे शहर पोलिस ठाण्यात पहाटे दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mahalakshmi Credit Union's employee was bribed with five lakhs, night operation of ACB at bus stand in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे