महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे! - संजय राऊत
By Admin | Published: June 12, 2017 04:02 PM2017-06-12T16:02:19+5:302017-06-12T16:02:19+5:30
शेतक:यांच्या हितासाठी 25 जुलैनंतर आंदोलनाची तत्वत: तयारी
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.12 : महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे होतील, त्यात उत्तर महाराष्ट्राचे मोठे योगदान असायला हवे, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केल़े तसेच कजर्माफी न झाल्यास 25 जुलै नंतर आंदोलनासाठी शिवसेना तत्वत: तयार असल्याचेही ते म्हणाल़े
शिवसेनेतर्फे राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून त्यानुसार सोमवारी शहरातील राजर्षी शाहू नाटय़मंदीरात शिवसैनिकांचा मेळावा झाला़ त्यावेळी खासदार राऊत बोलत होत़े ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार जुलै महिन्यात राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केल़े त्यानंतर अवघ्या 24 तासात शेतकरी कजर्माफीची घोषणा झाली़ नुसत्या घोषणेचे धक्के वर्षा निवासस्थानासह मंत्रालयाला बसल़े मोदींचे सरकार येऊनही भ्रमनिरास होत असून जनतेच्या भल्यासाठी शिवसेनेने संघर्षाची भुमिका घेतल्याचे खासदार संजय राऊत म्हणाल़े त्याचप्रमाणे शेतक:यांच्या उरावर बसणारा समृध्दी महामार्ग होऊ देणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केल़े या कार्यक्रमाला पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बबन थोरात व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होत़े
काश्मिरचे काय?
सत्ता आल्यास काश्मीरमध्ये एकही जवान शहीद होऊ देणार नाही, अशी घोषणा मोदी सरकारने केली होती़ तुमच्या जिल्ह्याचे संरक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांना काश्मीरमध्ये काय चालले आहे हे विचारा, असे खासदार संजय राऊत मेळाव्यात म्हणाल़े दररोज शहीद जवानांचे पार्थिव आणावे लागत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टिका केली़