वन समितीकडून महु फुलांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:41 PM2019-03-19T22:41:08+5:302019-03-19T22:42:33+5:30

पिंपळनेर : जंगलातील ४१५ वृक्षांचा समावेश, सर्वाधिक २६०० चा भाव

 Mahu Flowers Auction by Forest Committee | वन समितीकडून महु फुलांचा लिलाव

dhule

Next

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे मंगळवारी वन व्यवस्थापन समितीअंतर्गत जंगलातील ४१५ महु फुलांच्या वृक्षाचा लिलाव करण्यात आला. त्यात सर्वाधिक २६०० रुपयांचा भाव मिळाला.
याप्रसंगी वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष साहेबराव पवार, सचिव चंदु चौधरी, मोतीराम पवार, बंडू बागुल, सोमनाथ चौरे, वसंत भोये, कैलास पवार, बाबुराव पवार, भुऱ्या पवार, दयाराम पवार, वंदना चौरे, सुनिता चौरे, किसन भोये, श्रावण पवार, खतु चौरे, शिवा पवार, चैत्राम पवार, वनरक्षक बी.बी. भोई, कायम वनमजूर चिंधा चौरे आदी उपस्थित होते.
वृक्षानुसार लागते बोली
११०० हेक्टर जंगलात असलेल्या महू वृक्षाच्या फुलांचा लिलाव प्रत्येक महुच्या झाडाजवळ जाऊन त्याची बोली लावण्यात आली. या महु झाडांची किंमत त्याला आलेला बहर, आकारावर, तसेच यापासून किती फुलांचे उत्पादन मिळेल, यावर अवलंबून असते. त्यानुसार प्रत्येक महु झाडाची बोली वेगवेगळी असते, या लिलावाची सुरुवात ५० रूपयांपासून सुरू होते.
मंगळवारी ५० रुपये त २६०० रुपयांपर्यंत लिलाव झाला. यात सगळ्यात महाग २६०० रुपयांचा लिलाव झाला. मंगळवारी लिलाव असल्याने नागरिक व महिलांनी जंगलात गर्दी केली होती.
अनेक वर्षांची परंपरा
गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु असून जंगलक्षेत्रात असलेल्या महू झाडांची लिलाव पद्धत सुरु आहे. यासाठी काही नियम व अटी देखील आहेत. त्यात महु झाडाचे फक्त फुले वेचावे. त्या झाडाच्या फांद्या तोडू नये. झाडाच्या आजूबाजूला पेटवू नये व जाळ करू नये. आपण विकत घेतलेल्या महु झाडाचीच फुले वेचावीत. दुसऱ्याच्या झाडाचे महु फुले वेचतांना सापडल्यास किंवा माहिती मिळाल्यास ५ हजार ५१ रुपयांचा दंड राहतो.
२१ हजार ४५० रुपयात लिलाव
लिलाव संपल्यानंतर वन भोजनाचा कार्यक्रम झाला. उरलेली रक्कम वनव्यवस्थापन समितीत ठेवली जाते. मंगळवारी जंगल परिसरातील ४१५ महु फुलांच्या वृक्षाचा २१ हजार ४५० रुपयात लिलाव झाला.

Web Title:  Mahu Flowers Auction by Forest Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे