मैत्रेय कंपनीची मालमत्ता विक्री करून परतावा द्या!
By admin | Published: July 17, 2017 05:36 PM2017-07-17T17:36:49+5:302017-07-17T17:36:49+5:30
धुळ्यात भव्य मोर्चाद्वारे पीडित ठेवीदारांनी जिल्हाधिका:यांना दिले निवेदन.
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.17 - मैत्रेय कंपनीच्या मालमत्तेचा शोध घेण्यात यावा, तसेच मालमत्तेची जाहिर विक्री करून ठेवीदारांना परतावा देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील कंपनीच्या ग्राहकांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे. सोमवारी सकाळी पीडित ग्राहकांनी भव्य मोर्चा काढून ही मागणी केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तेथे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले.
या मोर्चात हजारो ठेवीदार सहभागी झाले. त्यात पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. विविध मागण्यांचे फलक त्यांनी हातात घेतले होते. नदीकाठावरील पांझरा चौपाटीवरून सकाळी 10 वाजता ठेवींदारांच्या या मोर्चास प्रारंभ झाला. मैत्रेय उपभोक्ता एवम अभिमर्ता असोसिएशनने या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा न्यू सिटी हायस्कूल, महापालिका कार्यालय व गरुडबाग मार्गे सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यानंतर मोर्चाचे 11 पदाधिका:यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले.
शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. चर्चेनंतर उपजिल्हाधिकारी भारदे यांनी, शासनामार्फत पाठपुरावा करण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
जिल्ह्यातील 300 कोटी अडकले
मैत्रेय कंपनीचे देशभरात 28 लाख ठेवीदार आहेत. धुळे जिल्ह्यातील सुमारे 3 लाख ठेवीदारांचा समावेश आहे. या ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये मैत्रेय’च्या चारही कंपन्यांमध्ये अडकले आहेत, अशी माहिती मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप शिसोदे यांनी दिली.