‘मजीप्रा’ कर्मचाºयांचा बेमुदत संप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:27 AM2017-02-23T00:27:04+5:302017-02-23T00:27:04+5:30
धुळे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाºयांचे वेतन व निवृत्तीवेतनाचे दायित्व राज्य शासनाने स्वीकारावे
धुळे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाºयांचे वेतन व निवृत्तीवेतनाचे दायित्व राज्य शासनाने स्वीकारावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीतर्फे ५ मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारल्याचे जाहीर करण्यात आले आहे़ त्याबाबतचे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले़
राज्यातील नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा आणि मलनि:सारण कार्यक्रम जलदगतीने विकास व नियमन करण्याच्या अनुषंगाने अधिनियम १९७६ अन्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना झाली आहे़ मजीप्राचा खर्च आतापर्यंत मिळणाºया १७़५ टक्के ईटीपीमधून भागविण्यात येत होता मात्र ७२ व ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार पाणीपुरवठा व्यवस्थापन, नियोजन व कार्यान्वन स्थानिक संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आल्याने मजीप्राचे उत्पन्नाचे स्त्रोत अत्यंत कमी झाले आहे़ मजीप्राच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी टिपणी तयार करण्याचे आदेश दिले होते, मात्र आतापर्यंत त्याबाबत निर्णय झालेला नाही़ त्यामुळे मजीप्रा कर्मचारी १ ते ४ मार्च काळ्या फिती लावून काम करणार असून ५ मार्चपासून मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी संपावर जातील़ मुंबईचे आझाद मैदान व प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असून तसे निवेदनाव्दारे स्पष्ट करण्यात आले़ या वेळी एस़पी़ पडियार, व्हीक़े़सूर्यवंशी, एस़व्ही़वाणी, यू.आऱ भोई, एस़एस़धोत्रे, एच़जे़ शेख उपस्थित होते़