मजीप्रा कर्मचा:यांची सुटका

By Admin | Published: May 30, 2017 12:30 AM2017-05-30T00:30:56+5:302017-05-30T00:30:56+5:30

सहा तास कोंडले : मनपा सभापतींनी ठोकले टाळे

Majpra employee: rescued | मजीप्रा कर्मचा:यांची सुटका

मजीप्रा कर्मचा:यांची सुटका

googlenewsNext

धुळे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवरंग टाकी परिसरातील     कार्यालयाला ठोकण्यात आलेले टाळे तब्बल सहा तासानंतर सोमवारी संध्याकाळी उघडण्यात आले. मनपा स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता हे टाळे ठोकून धरणे आंदोलन केले होते. एकवीरादेवी मंदिर रस्त्यावर  महिनाभरापूर्वी खड्डे खोदून  जलवाहिनी न टाकल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले.
मध्यस्थीनंतर तोडगा
एकवीरादेवी मंदिर रस्त्यावर भक्तनिवासाचे बांधकाम सुरू असून रस्त्यापासून भक्तनिवासार्पयत जलवाहिनी टाकण्यासाठी एक महिन्यापूर्वी खोदकाम करण्यात आले आह़े परंतु जलवाहिनीचे काम होत नव्हते. त्यामुळे  सोमवारी सकाळी  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला बाहेरून कुलूप लावून  10 ते 12 अधिकारी, कर्मचा:यांसह ठेकेदाराच्या प्रतिनिधीसही कोंडण्यात आले होते.अखेर सायंकाळी पाच वाजता मनपा सहायक आयुक्त  त्र्यंबक कांबळे यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल़े 

Web Title: Majpra employee: rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.