नवलनगर (ता. धुळे) येथे कायमस्वरूपी दारूबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:45 AM2019-06-26T11:45:14+5:302019-06-26T11:46:13+5:30

महिलांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली मागणी

 Make a permanent slaughter in Navalnagar (Taluka Dhule) | नवलनगर (ता. धुळे) येथे कायमस्वरूपी दारूबंदी करा

नवलनगर (ता. धुळे) येथे कायमस्वरूपी दारूबंदी करा

Next
ठळक मुद्देदारूमुळे व्यसनाधिनता वाढलीदारू विक्रेत्यांवर कारवाईची गरजदारूबंदीसाठी महिलांची निदर्शने

आॅनलाइन लोकमत
धुळे :तालुक्यातील नवलनगर येथे दारू विक्रीचे व व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मौजे नवलनगर येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी, अशी ग्रामपंचायत सरपंचासह महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत गृहराज्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नवलनगरमधील विविध भागात तसेच रस्त्यालगत असलेल्या छोट्या टपऱ्यांवर, हॉटेल, ढाब्यांवर सर्रासपणे देशी-विदेशी दारू विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. बाहेरगावाहून काहीजण दारू पिण्यासाठी नवलनगरला येतात, धिंगाणा घालत असतात. त्यामुळे बसस्थानकाजवळून जाणाºया येणाºया प्रवाशांना किंवा ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतो. गावात शिक्षणाची सोय असल्याने, आजुबाजुच्या परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी नवलनगरला येत असतात. शाळा सुटल्यावर विद्यार्थिनींची चेष्टा, छेड या मद्दपींकडून केली जात असते.
गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंदीसाठी महिलांनी कंबर कसलेली आहे. धुळ्याकडून गावाकडे येतांना विविध हॉटेल्स, ढाबे असून, त्यावर सर्रास दारू विक्री होत असते. गावातही काहीठिकाणी दारू विक्री होते. दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शॉपिंगमध्ये, गावठाणच्या जागेवर कोणी दारूविक्री किंवा व्यवसाय करीत असेल त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर सरपंच शोभा भिल, यांच्यासह उपसरपंच महेंद्र पाटील, ग्राम विकास अधिकारी एस.एस. वाघ यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.
यावेळी नवलनगरच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली.
मागणीचे निवेदन पालकमंत्री दादा भुसे, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह इतर अधिकाºयांनाही दिले आहे.

 

Web Title:  Make a permanent slaughter in Navalnagar (Taluka Dhule)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे