धुळे जिल्हयातील मालपूर येथे शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्ता दुरूस्त केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:48 AM2020-09-29T11:48:07+5:302020-09-29T11:48:27+5:30
शेतात जाणे झाले सोयीचे
आॅनलाइन लोकमत
मालपूर (जि.धुळे) : अनेकदा मागणी करूनही मालपूर- रामी हा शेतीशिवारात जाणारा रस्ता दुरूस्त न केल्याने, अखेर शेतकऱ्यांनीच लोकवर्गणी करून रस्त्याची दुरूस्ती केली.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतशिवारातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. यामुळे रामी, खोक्राडे येथे जाण्यासाठी देखील प्रवांशाना काटेरी झाडे व खड्डे चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यातच या रस्त्याचा शेतशिवारातुन शेती माल घरी आणण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होती. दोन वर्षांपूर्वी तयार झालेला मालपूर-रामी रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी शेतकºयांनी अनेकदा मागणी केली. मात्र संबंधित विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. अखेर े येथील शेतकºयांनी वर्गणी गोळा करुन रामी मालपूर रस्त्यावरील काटेरी झाडी झुडपे तोडुन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यात मुरुम टाकुन भराव केला. रस्ता दुरूस्त झाल्याने शेतकºयांना आपल्या शेतापर्यंत जाणे सोयीचे झालेले आहे.