परप्रांतीयाला ‘मनसे’ स्टाईल चोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 05:59 PM2019-03-04T17:59:35+5:302019-03-04T17:59:59+5:30
महिलेची छेडखानी भोवली : जाचाला कंटाळून दिली होती तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील एका महिलेशी अश्लिल वर्तन करणाºया आणि त्या महिलेची छेड काढणाºया परप्रांतीयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला़ पांझरा नदीलगत लहान पुलाजवळील शिवाजी रोडवर सोमवारी दुपारी ही घटना घडली़
रोजगार आणि अन्य कामांसाठी शहरात आलेल्या परप्रांतीयाचा धुमाकूळ सध्या वाढत आहे़ महिलांना आणि युवतींना त्याचा अधिक त्रास होऊ लागला आहे़ अशाच एका परप्रांतीयाने महिलेशी अश्लिल वर्तन केले़ सुरुवातीला या महिलेने दुर्लक्ष केले़ कालांतराने त्याचा हा प्रकार वाढतच गेला़ यातून त्याने या महिलेची थेट छेड काढण्याचा प्रयत्न केला़ घाबरलेल्या या महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अजित राजपूत यांना आपबिती कथन केली़ राजपूत यांनी ही बाब युवा नेते आबा सोनवणे, शहराध्यक्ष हर्षल परदेशी, तुषार हरणे, शुभम माळी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सांगितली़
छेडखानी करणाºया या परप्रांतीय तरुणाला लहान पुलानजिक शिवाजी रोडवर गाठण्यात आले़ त्याला सुरुवातीला महिलांची छेडखानी का करतो असा जाब विचारला़ त्यानंतर चांगलाच चोप दिला़