कोरोनाकाळात उच्च रक्तदाब असलेल्या तब्बल ७३ रुग्णांनी गमवला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:58+5:302021-06-02T04:26:58+5:30
वयाची सत्तरीपार केलेल्या रुग्णांना अधिक धोका जिल्ह्यासह महानगरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. या ...
वयाची सत्तरीपार केलेल्या रुग्णांना अधिक धोका
जिल्ह्यासह महानगरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. या कालावधीत ६० ते ७० वयोगटातील ८२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर ५१ ते ६० वयोगटातील ७९ रुग्ण आहेत. याच कालावधीत २१ ते ३० वयोगटातील तब्बल पाच तरुणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
पाहिल्या लाटेतील ऑगस्ट, तर दुसऱ्या लाटेतील एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. पहिल्या लाटेत रुग्णांमध्ये घशात दुखणे, खोकला, सर्दी तसेच ताप अशी लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेण्यासाठी वेळ मिळत होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मर्यादित होती. या पहिल्या लाटेत मार्च ते जून २०२० या कालावधीत ६२५ कोरोनाबाधित, तर ३० रुग्णांचा मृत्यू झालेला होता. जुलै महिन्यात ५११ रुग्ण, २८ मृत्यू तर ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन हजार ३४३ रुग्ण व ६० रुग्णांचा मृत्यूचा आकडा पार केला होता. त्यानंतर पहिल्या लाटेचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याने सप्टेंबर महिन्यात दोन हजार ७८ रुग्ण बाधित, तर ४२ रुग्णांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर अशा दोन महिन्यात केवळ सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर जानेवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाधित प्रमाणात वाढ होऊन मृत्युसंख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. शासकीय आकडेवारीनुसार जानेवारी २०२१ महिन्याभरात १८७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते तर दोन जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ७७७ बाधित आढळले होते तर मार्च व एप्रिल या दोन महिन्यात महानगरात सहा हजार ५९४ बाधितांमध्ये ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.