गरीबांच्या मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:23 PM2020-04-24T22:23:09+5:302020-04-24T22:23:31+5:30
कोरोनामुळे वाढल्या अडचणी : संघटनांसह व्यक्तीगत अन्नांचे होतेय वाटप
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गरीब व गरजू नागरीकांचे हाल होत आहेत़ त्यांच्यासाठी सामाजिक संघटना आणि व्यक्तीगत स्वरुपात अनेक जण सरसावले आहेत़ त्यांच्या माध्यमातून अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे़
प्राथमिक शिक्षक संघटना
धुळे तालुक्यातील कुसूंबा येथे भवानी भिलाटी येथील नागरिकांना धुळे तालुका शिक्षक समितीच्यावतीने जीवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले. ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात आला़ भवानी भिलाटी येथील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू त्यात तांदूळ, बाजरी, साखर, गुळ, तेल, दाळ, साबण अशा विविध वस्तुचे एक किट तयार करुन जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स ठेवून, मास्क घालून वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे बापू पारधी, एकनाथ भामरे, आनंद पाटील, रमेश पाटील, सुरेश पाटील, महेंद्र पाटील, न्हानू माळी, विशाल परदेशी, जगदिश परदेशी, प्रविण गवळे, जिल्हा परिषद कुसुंबा भिलाटी शाळेचे मुख्याध्यापक जगदिश बडगुजर, मिना राजपुत, प्रभाकर रायते, सुजाता बागुल व गावकरी उपस्थित होते.
कपील सोनार यांचा पुढाकार
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखत असतानाच अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी कपिल सोनार सरसावले आहेत़ गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरु आहे़ सोडा गाडीवाले, चहा टपरीवाले, बर्फाचा गोळावाले, रिक्षाचालक तसेच धुणी भांडी करणाऱ्या महिलांना आतापर्यंत दिडशे कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आलेला आहे. तसेच पाचशे पेक्षा अधिक व्यक्तींना मास्क वाटप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या या उपक्रमाला त्यांचे वडील प्रमोद सोनार यांची मोलाची साथ लाभत आहे. तसेच आई मिनाक्षी सोनार व पत्नी कविता सोनार यांचे स्वयंपाक घरात विशेष सहकार्य लाभत आहे.
अनिल दिक्षीत यांची मदत
भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल दिक्षीत यांनी कामगार आघाडीच्या माध्यमातून २३ मार्च पासुन रोज ५ या प्रमाणे कामगार, पुरोहित इ. सुमारे १२५ पेक्षा जास्त गरजंूना मदतीच्या किट चे वाटप केले आहे़ ज्यात ५ किलो तांदूळ, ३ किलो गहू, १ किलो शेंगदाणे, १ किलो तेल, तिखट व हळद, १ किलो तूरडाळ, १ किलो चहा पावडर, खोबरेल तेल बाटली इ. चा समावेश आहे़ याशिवाय पायी जाणाºया (पायी प्रवास करणाºया) गरीब लोकांना स्व खर्चाने खिचडी चे वाटप केले जात आहे़ गेल्या महिन्याभरापासून उद्योग बंद असल्यामुळे काहींवर उपासमारीची वेळ आली आहे़