सातबारा अद्ययावतसाठी १५ मार्चची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:09 AM2018-02-14T11:09:22+5:302018-02-14T11:11:55+5:30

जिल्हा प्रशासन : संकेतस्थळाच्या सर्व्हर डाऊनमुळे येताहेत अडचणी; रात्री उशिरापर्यंत करावे लागते काम

March 15 deadline for date update | सातबारा अद्ययावतसाठी १५ मार्चची मुदत

सातबारा अद्ययावतसाठी १५ मार्चची मुदत

Next
ठळक मुद्देआॅनलाइन सातबारा अद्ययावत करण्यासाठी राज्यभरात एकाच वेळी काम सुरू आहे. परिणामी, हे काम ज्या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे, त्या संकेतस्थळाचे सर्व्हर दिवसभर डाऊन असल्यामुळे तलाठी व मंडळाधिकाºयांना हे काम रात्री उशिरापर्यंत थांबून करावे लागत आहे. दिवसापेक्षा सायंकाळी सहा वाजेनंतर संकेतस्थळ बºयापैकी चालते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.तलाठी व मंडळाधिकाºयांनी या कक्षात येऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सर्वसामान्यांना एका क्लिकवर सातबारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शासनाने आॅनलाइन सातबारा देण्याचे ठरविले होते. परंतु, सद्य:स्थितीत सातबारा उताºयांमध्ये आढळून आलेल्या चुकांच्या दुरुस्तीचे (रि-एडिट मोड्यूल) काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. या चुका दुरुस्तीसाठी दिलेल्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन येत असल्याने हे काम करताना अडचणी येत असून त्यात आता प्रशासनाने हे काम पूर्ण करण्यासाठी १५ मार्चची मुदत दिल्याने तलाठी व मंडळाधिकारी  रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून सातबारा उतारे अद्ययावत करताना दिसत आहेत. 
 शासनाने सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी आॅनलाइन सातबारा उतारा वितरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तलाठी व मंडळाधिकाºयांना हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येऊन सातबारा  आॅनलाइनचे कामही पूर्ण झाले होते. परंतु, जिल्ह्यातील ६७८ गावांमध्ये झालेल्या चावडी वाचन कार्यक्रमात आॅनलाइन सातबाºयांमध्ये चुका असल्याचे समोर आले होते. 
महिनाभरात ४५ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान 
आॅनलाइन सातबारा अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यातील तलाठी व मंडळाधिकाºयांना १५ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ६७८ गावांपैकी ३७४ गावांचे सातबारा उतारे अद्ययावत झाले आहेत. आतापर्यंत हे काम ५५ टक्के झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता १५ मार्चपर्यंत ४५ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान तलाठी व मंडळाधिकाºयांसमोर राहणार आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील ३०४ गावातील सातबारा उतारे अद्ययावत करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. 
सर्व्हर डाऊनची समस्या जैसे थे
गेल्या वर्षी आॅनलाइन सातबारा तयार करण्याचे काम यंत्रणेने हाती घेतले होते़  तेव्हापासून सर्व्हर डाऊनची समस्या येत होती. तलाठी व मंडळाधिकारी यांनी ही समस्या जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यासाठी शासनाकडेही पाठपुरावा केला. हे काम पूर्ण झाल्यानंतर या उताºयांमध्ये आढळून आलेल्या चुका दुरुस्तीसाठी सुरुवातीला शासनाने ‘एडिट’चा पर्याय दिला. मात्र,  तरीही आॅनलाइन उताºयांमध्ये अनेक त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यासाठी शासनाने पुन्हा चुका दुरुस्तीसाठी ‘रि-एडिट’ मोड्यूल उपलब्ध करून दिले़  मात्र,  आता  सातबारा अद्ययावतसाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन येत असल्याने सातबारा अद्ययावतसाठी अडचणी येत आहेत. 
शिरपूर तालुक्यातील १०३ गावांचे सातबारा उतारे अद्ययावत  
शिरपूर तालुक्यातील १३८ गावांपैकी १०३ गावांचे सातबारा उतारे अद्ययावत झाले आहेत. तर धुळे तालुक्यातील १७० गावांपैकी ८६, शिंदखेडा तालुक्यातील १४३ गावांपैकी ९४, तर साक्री तालुक्यातील २२७ गावांपैकी ९१ गावांचे सातबारा हे अद्ययावत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

१५ मार्चपर्यंत सातबारा उतारे अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यभरात आॅनलाइन काम सुरू आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनची समस्या येत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तलाठी, मंडळाधिकाºयांना सजा कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या स्वतंत्र कक्षात जाऊन हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
    -गणेश मिसाळ, प्रांताधिकारी. 

Web Title: March 15 deadline for date update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.