मणिपूर राज्यातील घटनेच्या निषेधार्थ शिरपुरात मोर्चा, सांगवीला रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 05:30 PM2023-07-26T17:30:57+5:302023-07-26T17:32:11+5:30
मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे समस्त आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला.
सुनील साळुंखे
शिरपूर : मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी शिरपूर तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान दरम्यान, गुजराथी कॉम्प्लेक्स, पाचकंदिल चौक व कन्या शाळेजवळ लावलेल्या भाजपच्या बॅनरवर अज्ञातानी दगड भिरकावले. तत्पूर्वी, सकाळी महामार्गावरील सांगवी गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे समस्त आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. मोर्चाची सुरूवात चोपडाजीन पासून झाली. हा मोर्चा मार्गस्थ होत असताना गुजराथी व्यापारी संकुल, पाच कंदिल, कन्या शाळेजवळ भाजपच्या बॅनरवर मोर्चातील काहींनी दगड भिरकावले. हा अपवाद वगळता मोर्चा शांततेत प्रांत कचेरीवर पोहचला. मोर्चात सुमारे ८ ते १० हजार आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी सत्यम गांधी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आदिवासी संघटनांतर्फे मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.