बेरोजगारीवर लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 02:37 PM2019-02-13T14:37:18+5:302019-02-13T14:39:02+5:30

मोर्चात मोदी सरकारविरोधी दिल्या घोषणा

 To mark the unemployment, Dhule District President - Vadti Congress | बेरोजगारीवर लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे मोर्चा

बेरोजगारीवर लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे मोर्चा

Next
ठळक मुद्देमोर्चेकऱ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणलामोर्चात राष्टÑवादीचे शेकडो कार्यकर्ते सहभागीजिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

आॅनलाइन लोकमत
धुळे-बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे ‘जबाब दो, जॉब दो’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात राष्टÑवादी कॉँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकारविरोधी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चा क्युमाईन क्लबवर पोहचल्यानंतर राष्टÑवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
मोर्चाची सुरूवात महात्मा गांधी पुतळ्यापासून झाली. जुना आग्रारोड, महानगरपालिकामार्गे हा मोर्चा क्युमाईन क्लबवर पोहचला. यावेळी मोदी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या साडेचार वर्षात संपूर्ण देशात रोजगाराची स्थिती भयावह झालेली आहे. नैराश्यापोटी उच्चशिक्षित तरूणपिढी साधू-सन्यासी होण्याकडे वळली आहे, हे मोठे राष्टÑीय संकट आहे. मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण झाले नाही, उलट नियोजनशुन्य नोटाबंदीमुळे लाखो लोकांना रोजगार केला. बांधकाम क्षेत्र पार उद्धवस्त झाले. सर्वच प्रकारच्या व्यवसायामध्ये मंदी आली.
धुळ्यासारख्या मागास भागात उद्योग-व्यवसाय नाहीत, मोठी सरारी महामंडळे, आस्थापने नाहीत. त्यामुळे रोजगार नाही. बेरोजगारी हटवायची काहीच कार्यवाही प्रत्यक्षात दिसत नाही. त्यामुळे तरूणांमध्ये प्रचंड रोष आहे.
या मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.

 

Web Title:  To mark the unemployment, Dhule District President - Vadti Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.