पूर्वसंध्येला गर्दीने बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:04 AM2019-02-14T00:04:41+5:302019-02-14T00:05:44+5:30
‘व्हॅलेंण्टाईन डे’चा उत्साह : गुलाबाची फुले, टेडी, चॉकलेट्स व ग्रीटिंग्जना वाढती मागणी
धुळे : देशभरात गुरूवारी साजरा होणाऱ्या ‘व्हॅलेंण्टाईन डे’चा अपूर्व उत्साह शहर व जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही दिसून आला. या दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या प्रियजनांना भेटीदाखल देण्यात येणाºया विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक विशेषत: तरूणाई बाहेर पडली होती. वस्तू खरेदी करणाºयांमध्ये आबालवृद्धांचा मोठा सहभाग दिसून आला.
व्हॅलेंण्टाईन डे साजरा करण्यापूर्वी वेगवेगळे दिवस साजरे करण्याची क्रेझ वाढत आहे. रोझ डे, टेडी डे, चॉकलेट् डे अशा विविध नावाने एकेक दिवस साजरा केला जातो. मात्र या सर्वांवर ‘व्हॅलेंण्टाईड डे’ निश्चितच कळस चढविणारा ठरतो. त्याचा प्रत्यय बुधवारी पूर्वसंध्येला आला. दुपारपासून बाजारांमध्ये गर्दी होऊ लागली होती. संध्याकाळी तरुणाईसह साºयांच्या निरनिराळ्या वस्तू, साहित्याच्या खरेदीच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यामुळे विक्रेत्यांना दुकानात परस्परांशी सवड मिळत नसल्याचे दृश्य दिसले. येणाºया प्रत्येकास त्याच्या आवडीप्रमाणे एकेक वस्तू दाखविण्यात ते गढून गेल्याचे दिसून आले.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा गर्दी कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुष्काळामुळे ग्रामीण भागातून खरेदीस येणाºया ग्राहकांची गर्दी काहीशी आटल्याचे सांगण्यात आले. गुलाबाची फुले, विविध आकारातील व रंगातील टेडी बीअर, त्याच प्रमाणे चॉकलेट्स, विविध मनोहारी रंगात उपलब्ध असलेली ग्रीटिंग्ज कार्ड नागरिकांचे लक्ष वेधत होते. त्यांच्या किमती १० रुपयांपासून दीडशे रूपयांपर्यंत होत्या.
वस्तूंची आकर्षक पॅकिंग
खरेदीच्या बजेटनुसार विचारणा केली जाऊन तत्परतेने खरेदी केली जात होती. घेतलेल्या वस्तूंची आकर्षक कागदात बांधण्यासाठी दुकानदारांना प्रेमळ विनंती करण्यात येत होती. व्हॅलेंण्टाईन डेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे महत्त्व जाणून असलेल्या विक्रेत्यांकडून पॅकिंगचा अतिरिक्त खर्च न घेता त्याचा भार ते स्वत:च उचलताना दिसून आले. त्यासाठी खास करून एक-दोघांची नियुक्तीही करण्यात आली होती.
इमिटेशन ज्वेलरीलाही मागणी
महाविद्यालयीन तरूणी व महिलांकडून यानिमित्ताने भेट देण्यासाठी इमिटेशन ज्वेलरीस पसंती दिली जात होती. विशेषत: आकर्षक नेकलेस, कानातील रिंगा, तसेच वेगवेगळ्या डिझाईन व रंगाच्या ज्वेलरीला मागणी असल्याचे अजय महाजन यांनी सांगितले.
गुलाबावर जास्त भर
व्हॅलेंण्टाईन डे निमित्त भावनांना अधोरेखीत करण्यासाठी लाल गुलाबावर जास्त भर असल्याचे विक्रेते सागर माळी यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा गर्दी कमी असली तरी यंदाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्ष व्हॅलेंण्टाईन डे दिनी अजून जोरदार प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त झाली. आग्रारोडवरील झगमगाट या निमित्ताने वाढल्याचे दिसून आले.