पैशांसाठी विवाहितेचा छळ
By admin | Published: February 17, 2017 11:25 PM2017-02-17T23:25:05+5:302017-02-17T23:25:05+5:30
चाळीसगाव रोड : पतीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : कापड व्यवसायासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा सासरी सुरत येथे छळ करण्यात आला़ याप्रकरणी तिच्या पतीसह सहा जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मलिकाबानो नासीरखान पठाण (वय 29) या विवाहितेने पोलिसात फिर्याद दाखल केली आह़े त्यानुसार 21 जानेवारी 2016 रोजी लगA झाल्यानंतर महिनाभरातच तीन लाखांची मागणी सुरू झाली आणि त्यासाठी कुरापती काढून मारहाण केली जाऊ लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पतीने लोखंडी पाइपाने मारून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार आहे. याप्रकरणी पती नासीर अहेमद खान, सासरे अहेमद खान, सासू सायराबानो अहेमद खान, दीर जावीद खान अहेमद खान, नणंद आयशा खान अहेमद खान, शाहीनबानो सोहेल खान (सर्व रा़ राजूनगर, सुरत) यांच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिसांत भादंवि कलम 498 (अ), 406, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
15 लाखांसाठी विवाहितेचा छळ
घराचे कर्ज फेडण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करून मोनिका गोकूळ वाघ (वय 21, रा.दिंडोली, ह़मु. रामी, ता़शिंदखेडा) या विवाहितेने सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची फिर्याद दिली आहे. आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासरच्यांनी हाकलून दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या फिर्यादीवरून पती गोकूळ दंगल वाघ, सासरे दंगल वाघ, सासू देवकाबाई दंगल वाघ, जेठ, जेठाणीसह आणि दोन जणांविरुद्ध (सर्व रा.दिंडोली उधना, सुरत) दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.