व्यापाऱ्यास लुटणारे दरोडेखोर मुद्देमालासह शिताफीने जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:58 PM2019-06-21T22:58:28+5:302019-06-21T22:59:46+5:30
पाचपैकी तिघे अल्पवयीन : पोलिसांना यश; मधुबन कॉलनीतील घटना
धुळे : डोळ्यात मिरचीची पूड फे कून व्यापाºयाला लुटणाºया दरोडेखोरांच्या टोळीला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या विशेष पथकाने शिताफिने जेरबंद केले़ पाच दरोडेखोरांपैकी तीन अल्पवयीन आहेत़ त्यांच्याकडून चोरीची दुचाकी, मोबाईल आणि रोख असा एकूण ३ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
जेरबंद केलेल्या दरोडेखोरांची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉलमध्ये शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह विशेष पथकातील कर्मचारी उपस्थित होते़
मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरातील मधुबन कॉलनीत शैलेश दामाभाई चौधरी आणि अन्य एकाला त्यांच्या पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले़ त्यांच्या डोळ्यावर मिरचीची पूड फेकली़ त्यांच्याजवळ असलेली एमएच १८ एएच ७९३२ क्रमांकाची दुचाकी लांबविली़ या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे १० ते १२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले़ घटना घडल्यानंतर आरडाओरड सुरु झाली आणि क्षणार्धात याच भागातून त्यांची दुचाकी घेऊन या तिघा भामट्यांनी पळ काढला़ ही घटना १ जून २०१९ रोजी सायंकाळी उशिरा घडली़ यानंतर चौधरी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ फिर्याद दाखल झाल्यानंतर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली़ या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले़ लूट प्रकरणात कोण सहभागी असू शकेल असे अंदाज घेण्यात आल्यानंतर संशयित ताब्यात आले़ त्यांना पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले़ त्यांच्याकडून गुन्ह्याची कबूली मिळाली़ पोलिसांनी मयूर उर्फ बबवा सुरेश कंडारे, अनिल बाळकिशन रेड्डी या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले़ त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि रोकड हस्तगत करण्यात आली़