धुळ्यात सर्वसमावेशक महामूकमोर्चाला उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:51 PM2018-03-08T13:51:10+5:302018-03-08T13:51:10+5:30

दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरण : दोषींवर त्वरित कठोर कारवाईची मागणी 

Massive response to the inclusive Mahamukhama in Dhule | धुळ्यात सर्वसमावेशक महामूकमोर्चाला उदंड प्रतिसाद

धुळ्यात सर्वसमावेशक महामूकमोर्चाला उदंड प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे- भव्य महामूक मोर्चाव्दारे अत्याचाराच्या घटनेचा निषेध- अत्याचार करणाºया नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी- शिस्तबध्द मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिरातील पाचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषींवर त्वरित कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सर्व समावेशक महामूकमोर्चाला शहरातील मनोहर टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. आग्रारोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ मोर्चात हजारो हजार पुरूष, महिला सहभागी झाल्या़
मनोहर टॉकीजजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले़ त्यानंतर जिजाऊ वंदना झाली़ यावेळी पाच मुलींनी उपस्थित मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले़ त्यानंतर मोर्चा आग्रारोड, कराचीवाला खुंट, महापालिका कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बॅँक या मार्गे  जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला़ अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले़ मोर्चात भव्य काळा झेंडा घेऊन स्वयंसेवकांनी अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविला़  ११ विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले़ मोर्चाच्या समारोपापूर्वी सहा विद्यार्थिनींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ महामोर्चानंतर लागलीच स्वयंसेवकांनी रस्त्यांची स्वच्छता केली़ काही सेवाभावी संस्थांकडून मोर्चेकºयांसाठी पिण्याचे पाणी, नास्त्याची सोय करण्यात आली होती़ डोक्यावर एकसारख्या टोप्या परिधान करून मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला़ राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला़ मोर्चात राजकीय पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले़ त्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, हिलाल माळी, मनोज मोरे, अनुप अग्रवाल, सतिश महाले, महेश मिस्तरी, तेजस गोटे, सुनिल नेरकर, युवराज करनकाळ, शिवाजी दहिते, हिरामण गवळी, एम़जी़धिवरे यांचा समावेश होता़ 


 

Web Title: Massive response to the inclusive Mahamukhama in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.