तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेला मतीमंद तरुण पाकिस्तान सरहद्दीवर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 08:25 PM2017-09-27T20:25:18+5:302017-09-27T20:26:37+5:30

साक्री तालुका : राजस्थान पोलिसांनी पिंपळनेरला तरुणाला नातेवाईकांच्या सुपुर्द केले

Matimand Tarun, who was missing three years ago, was found on the Pakistan border | तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेला मतीमंद तरुण पाकिस्तान सरहद्दीवर सापडला

तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेला मतीमंद तरुण पाकिस्तान सरहद्दीवर सापडला

Next
ठळक मुद्देपिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांनी फोटोच्या आधारे त्या तरुणाचा मामा रमेश देवज्या चौरे, रा.जामखेल पैकी बहरीमपाडा यांची खबर घेत मिसींग नोंदवून घेतली. जामखेल येथील राहणार असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना दिली. त्यानुसार बुधवारी साकडा जि.जैसलमेर (राजस्थान) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मेगदान चारण व गोराराम बिष्णोई यांनी तीन वर्षापासून त्यांच्या ताब्यात असलेल्या विशाल भरत गायकवाड यास पिंपळनविशालचे मामा रमेश चौरे व मामी सुशिलाबाई यांनी विशालला ओळखले. त्यानंतर ए.पी.आय. सुनिल भाबड यांच्या समक्ष विशालला मामाच्या ताब्यात दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील जामखेल येथील विशाल गायकवाड हा २० वर्षीय मतीमंद तरुण तीन वर्षापासून बेपत्ता झाला होता. तो   राजस्थानमध्ये पाकिस्तान सरहद्दीवर जैसलमेर येथे सापडला. राजस्थान पोलिसांनी त्याने सांगितलेल्या पत्याचा शोध घेऊन  बुधवारी   पिंपळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांच्या समक्ष त्या तरुणाला  सुखरुप नातेवाईकांच्या स्वाधीन केले. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तीन-चार वर्षापूर्वी जामखेल ता.साक्री येथील विशाल भरत गायकवाड हा २० वर्षीय मतीमंद तरुण अचानक बेपत्ता झाला होता. विशालला वडील नव्हते. आई कुठे आहे पता नाही.  विशाल हा जामखेल येथे मामांकडे वयाच्या ५ व्या वर्षापासून राहत होता. तो मतीमंद होता. तो तीन-चार वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. आईवडील नसल्याने व मामा-मामी अशिक्षित असल्याने पोलीस ठाण्यात मिसींग दाखल केली नव्हती.
विशाल हा २३ एप्रिल २०१७ रोजी जाम बिहाड ग्रामीण भाग इतला येथे रामसिंग पूत्र हमीरसिंह की ढाणी बोनाडा येथे संदीग्ध अवस्थेत तेथील पोलिसांना मिळाला. त्याला २४ एप्रिल २०१७ रोजी जैसलमेर सीमेवर गुप्तचर एजन्सीकडे विचारपूस करण्यासाठी आणले. मात्र यावेळी हा मतीमंद असल्याने तो आपले नाव कधी  ईश्वर तर कधी ईशे खाँ व इरसाद  असे  सांगत होता. तर वडीलांचे नाव निंबीया रा.जाम बिहार तर कधी उत्तर प्रदेश सांगत होता.  तो मतीमंद म्हणून गुप्तचर एजन्सीतर्फे जिल्हा पोलिसांना त्याची विज्ञान प्रयोगशाळा जयपूर येथे  मानसिक टेस्ट घेण्याचे निर्देश केले. १९ जुलै २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७ दरम्यान माथूर चिकित्सालय जोधपूर येथे  त्याच्यावर उपचार करण्यात आले. तसेच मानसिक टेस्टच्या अहवालात तो   मतीमंद असल्याचे स्पष्ट झाले. उपचारानंतर त्याची मानसिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यामुळे तो आपण साक्री, पिंपळनेर येथील राहणार असल्याचे  सांगितले. 
तेव्हा राजस्थान पोलिसांनी देशात साक्री, पिंपळनेर गाव कुठेकुठे आहे. याचा शोध घेतला आणि त्यानुसार शोध घेऊन पिंपळनेर पोलिसांशी   पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना सगळी माहिती दिली. त्या तरुणाचा फोटो दिला.

Web Title: Matimand Tarun, who was missing three years ago, was found on the Pakistan border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.