धुळयात स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी महापौर महिला मॅरेथॉन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:28 PM2018-03-08T14:28:04+5:302018-03-08T14:28:04+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन, १५०० स्पर्धकांचा सहभाग

Mayor women marathon to honor women in Dhule! | धुळयात स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी महापौर महिला मॅरेथॉन!

धुळयात स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी महापौर महिला मॅरेथॉन!

googlenewsNext
ठळक मुद्दे- महापौर महिला मॅरेथॉन स्पर्धेत १५०० स्पर्धकांचा सहभाग- मनपा आवारात डिजेच्या तालावर नृत्याचा आनंद - मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिक वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेतर्फे गुरूवारी जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आयोजित महापौर महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली़ या स्पर्धेत १५०० महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला़ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोकि वितरण करण्यात आले़
मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ महापौर कल्पना महाले, नाशिक येथील मॅरेथॉनपटू डॉ़ श्वेता भिडे यांनी हिरवा झेंडा फडकावून केला़ यावेळी मशाल प्रज्वलित करण्यात आली़ मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गात दोन्ही बाजूस विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी टाळयांच्या गजरात स्पर्धकांना प्रोत्साहन दिले़ ठिकठिकाणी मनपा व श्रीराम गृ्रपतर्फे लिंबू सरबत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ सर्व महिला स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेत अत्यंत उत्साहाने धावल्या़ मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपानंतर मनपा आवारात डिजेच्या तालावर सर्वांनी नृत्याचा आनंद घेतला़ त्यानंतर विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले़ यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह मनपाचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते़ 

 

Web Title: Mayor women marathon to honor women in Dhule!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.